Ministry of MSME Recruitment : सूक्ष्म, लघु उद्योग मंत्रालयात निघाली भरती; सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय येथे लवकरच काही जागांसाठी (Ministry of MSME Recruitment) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून यंग प्रोफेशनल-02, सल्लागार ग्रेड 1-02, सल्लागार ग्रेड 2-01, वरिष्ठ सल्लागार-02 ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे.

विभाग – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2022

भरले जाणारे पद – (Ministry of MSME Recruitment)

  1. यंग प्रोफेशनल (Young Professional)
  2. सल्लागार ग्रेड 1 (Consultant Grade 1)
  3. सल्लागार ग्रेड 2 (Consultant Grade 2)
  4. वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • यंग प्रोफेशनल (Young Professional) –

उमेदवाराकडे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा प्रमुख शैक्षणिक संस्थांमधून BE/B.Tech किंवा CS किंवा IT किंवा MCA पदवी असावी.

तसेच संबंधित क्षेत्रात किमान 1 वर्षाचा अनुभव असावा.

  • सल्लागार ग्रेड 1 (Consultant Grade 1) –

उमेदवाराकडे बीई / बी-टेक / एमई / एम-टेक / एमबीए (वित्त) / एमए (अर्थशास्त्र) / एलएलबी/एलएलएम पदवी असावी.

तसेच संबंधित क्षेत्रात 05 वर्षांच्या कामाच्या अनुभवासह.

  • सल्लागार ग्रेड 2 (Consultant Grade 2) –

उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातील सल्लागार ग्रेड 2- LLB संबंधित क्षेत्रात किमान 8 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

  • वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) –

उमेदवाराकडे कोणत्याही क्षेत्रात पदव्युत्तर पदवीधर किमान 15 वर्षांचा सरकारी कामाचा अनुभव किंवा अवर सचिव कार्यालयात कामाचा अनुभव असलेल्या कॅडरमध्ये किमान 6 वर्षांचा अनुभव.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (Ministry of MSME Recruitment)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://msme.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com