करिअरनामा ऑनलाईन। कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, आणि इतर क्षेत्रातील अनेक उमेदवार बँकिंग क्षेत्रांकडे वळू (Banking Exam Preparation) लागले आहेत. बँकेत जॉब करण्यासाठी लाखो उमेदवार दरवर्षी अर्ज करत असतात. या पार्श्वभुमीवर स्टेट बँक ऑफ इंडिया Clerk भरतीच्या नोटिफिकेशनची वाट बघणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.
लवकरच जाहीर होणार नोटिफिकेशन
स्टेट बँक ऑफ इंडिया लवकरच लिपिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करणार आहे. दरवर्षी SBI लिपिक भरतीची अधिसूचना जानेवारी ते एप्रिल दरम्यान जारी केली जाते. मात्र यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. एका मीडिया रिपोर्टनुसार या भरतीची अधिसूचना SBI लवकरच जारी करणार आहे. SBI Clerk भरतीची अधिसूचना ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी केली जाऊ शकते. यासाठी SBI च्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. .
अशी असते पात्रता –
पदवी उत्तीर्ण उमेदवार SBI लिपिक भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
परीक्षेची वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
परीक्षेअंतर्गत पेपरच्या दोन फेऱ्या होतात.
ज्यामध्ये प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेचा समावेश होतो.
प्रीलिम्समध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जातं.
यंदा ही परीक्षा येत्या काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
SBI लिपिक प्रिलिम्स परीक्षा – (Banking Exam Preparation)
SBI क्लर्क प्रिलिम्स परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातात.
प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असतो.
त्यानुसार एकूण 100 गुणांचा पेपर तयार केला जातो.
यामध्ये इंग्रजी भाषेतून 30 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड (QA) मधून 35 प्रश्न आणि तर्कक्षमतेतून 35 प्रश्न विचारले जातात.
या परीक्षेतील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांना 1 तास वेळ देण्यात येतो.
SBI लिपिक मुख्य परीक्षा –
SBI Clerk प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेस बसण्याची संधी मिळते.
लिपिक मुख्य परीक्षेत 4 विषयांमधून प्रश्न विचारले जातात.
यात रिझनिंग आणि कॉम्प्युटर अॅप्टिट्यूडमधील 60 गुणांचे 50 प्रश्न असतात.
इंग्रजी विषयातून 40 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असतो. (Banking Exam Preparation)
QA मधून 50 गुणांचे 50 प्रश्न विचारले जातात आणि आर्थिक जागरूकता विषयातून 50 प्रश्न विचारले जातात.
मुख्य परीक्षेत एकूण 200 गुणांचे 190 प्रश्न विचारले जातात.
ही परीक्षा 2 तास 40 मिनिटांची असते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com