करिअरनामा ऑनलाईन। स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्टेनोग्राफर पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. स्टेनोग्राफर (SSC Recruitment 2022) ग्रेड C अंतर्गत, केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि विविध विभागांमधील स्टेनोग्राफरच्या रिक्त जागा भरल्या जातील, तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या रिक्त जागा स्टेनोग्राफर ग्रेड D द्वारे भरल्या जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार ssc.nic.in या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 सप्टेंबर 2022 आहे. तुम्हालाही ही परीक्षा देण्याची इच्छा असेल आणि सरकारी नोकरी हवी असेल तर या परीक्षेबाबतच्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्टेनोग्राफर परीक्षेचा सिलॅबस आणि exam पॅटर्नबद्दल माहिती देणार आहोत. पाहूया कसा आहे Syllabus आणि exam pattern याविषयी…
या गोष्टींचा समावेश –
SSC स्टेनोग्राफर ‘C’ आणि ‘D’ परीक्षेत 02 टियर्सचा समावेश करण्यात येणार आहे.
टियर-1 मध्ये CBT (संगणक आधारित मोड परीक्षा) असणार आहे तर टियर – 2 परीक्षेत शॉर्टहँड कौशल्य स्किल टेस्ट होणार आहे. यामध्ये टियर एकमध्ये General Intelligence & Reasoning, General Awareness, English Language & Comprehension या तीन गोष्टींची टेस्ट होणार आहे.
General Intelligence & Reasoning या सेक्शनमध्ये विचारण्यात येणाऱ्या टॉपिक्सची लिस्ट पुढीलप्रमाणे –
Classification, Word Formation, Venn Diagram, Matrix, Verbal reasoning, Non-Verbal Reasoning, Blood Relations , Analogy, Coding-Decoding, Paper Folding Method, Series.
General Awareness या सेक्शनमध्ये विचारण्यात येणाऱ्या टॉपिक्सची लिस्ट पुढीलप्रमाणे आहे –
Static General Knowledge (Culture, Indian History, etc.), Portfolios, People in News., Important Schemes, Science, Sports, Books and Authors, Current Affairs.
टियर 2 मध्ये शॉर्टहँड स्किल्स टेस्ट होणार – (SSC Recruitment 2022)
टियर 2 मध्ये शॉर्टहँड स्किल्स टेस्ट होणार आहे. ज्यांनी टियर एक परीक्षा पास केली त्या उमेदवारांना शॉर्टहँड स्किल्स टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे.
उमेदवारांना स्टेनोग्राफी चाचणीसाठी हजर राहावे लागेल.
उमेदवारांना 100 w.p.m च्या वेगाने इंग्रजी/हिंदीमध्ये 10 मिनिटांसाठी एक डिक्टेशन दिले जाईल.
स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ आणि स्टेनोग्राफर ग्रेड ‘डी’ पदासाठी 80 w.p.m. च्या वेगाने एक डिक्टेशन दिले जाईल.
असं आहे टियर-1 परीक्षेचं पॅटर्न –
परीक्षेची पद्धत – ऑनलाइन (संगणक आधारित चाचणी)
प्रश्नांचा प्रकार – एकाधिक निवड वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न
विभागांची संख्या – एकूण 03 विभाग
एकूण गुण – 200 गुण
प्रश्नांची संख्या – 200 प्रश्न
परीक्षेचा कालावधी – 120 मिनिटे
महत्वाचे – या परीक्षेत 0.25 मार्कांची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com