करिअरनामा ऑनलाईन। अॅमेझॉनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. कंटेन्ट रायटिंग, प्रूफ रीडिंग (Amazon Recruitment 2022) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. अॅमेझॉन ऑडिबलकडून ऑडियोबुक आणि पॉडकास्ट मध्ये नोकर भरती करण्यात येत आहे. इंटरनेटद्वारे बातम्या आणि मनोरंजनाशी संबंधित ऑडिओ कंटेंट तयार करण्यासाठीच्या पदांवर भरती करण्यात येत आहे. यासाठी इच्छुक उमेदवाराला लिहीण्याची समज आणि अनुभव असणं आवश्यक आहे. ही भरती चेन्नई, तामिळनाडूसाठी केली जाणार आहे.
कंपनी – अमेझॉन
भरले जाणारे पद –
- कंटेन्ट रायटिंग
- प्रूफ रीडिंग
अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन
आवश्यक पात्रता – (Amazon Recruitment 2022)
- कोणतीही पदवीधर व्यक्ती या नोकरीसाठी अर्ज करु शकते.
- उमेदवाराला कंटेंट रायटिंगचा अनुभव असणं गरजेचं आहे.
- प्रूफरीडिंग, कॉपी एडीटिंग आणि फॅक्ट-चेकिंग याचा किमान एक वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे.
- मेदवाराला डाटा बेस कॉन्सेप्ट (Excel Skills) माइक्रोसॉफ्ट वर्ड (Microsoft Word) यांची माहिती असणं आवश्यक आहे.
- इच्छुक उमेदवाराला सोशल मीडिया आणि इंटरनेट रिसर्च टूल्स म्हणजेच गूगल, गुडरीड्स आणि एसईओ (SEO) यांची माहिती असणं आवश्यक आहे.
- ऑनलाइन पुस्तकं, पॉडकास्ट, वेबसाइट, ब्लॉग आणि इतर डिजिटल कंटेट बाबतच्या मूलभूत गोष्टी आणि ट्रेंड माहिती असणं गरजेचं आहे.
काय आहे अॅमेझॉन ऑडिबल? –
- अमेजॉन ऑडिबल लोकप्रिय ई-कॉमर्स वेवसाईट अमेजॉनची कंपनी आहे.
- अमेजॉन ऑडिबल एक अॅप असून यामध्ये पुस्तकं, वर्तमानपत्र, मासिक ऐकण्यासाठी उपलब्ध असतात.
- याशिवाय यावर पॉडकास्ट, टीव्ही आणि रेडिओ शोही ऐकता येतात.
असं असेल कामाचं स्वरूप –
- सर्व Amazon Audible प्रोडक्टसबद्दल माहिती लिहीणे.
- प्रोडक्टस डिस्क्रिप्शन संबंधित तथ्यांची उलटतपासणी करणे आणि सर्व संबंधित माहितीचे प्रूफरीडिंग करणे. (Amazon Recruitment 2022)
- उत्पादनाची किंमत, विक्रीची तारीख, प्रादेशिक हक्क, रॉयल्टी कमावणारा, संबंधित Amazon ASIN कोड इ.चा रिव्ह्यू करणे.
असा करा अर्ज –
तुम्ही Amazon Jobs पेजवर जाऊन किंवा
https://bit.ly/3ddjGzT या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com