CBSE Results 2022 : CBSE बोर्डाचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार?

करिअरनामा ऑनलाईन । ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ने (CBSE) अद्याप इयत्ता (CBSE Results 2022) 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर केले नाहीत. CBSE कडून लवकरच इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित आहे. येत्या 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार, CBSE बोर्ड इयत्ता 10 वीचे निकाल 4 जुलैच्या आसपास आणि इयत्ता 12 वीचे निकाल 10 जुलैच्या आसपास जाहीर करेल; अशी अपेक्षा आहे. मात्र बोर्डाने अजून कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.

असे असेल मूल्यांकन – (CBSE Results 2022)

  1. CBSE बोर्डाकडून टर्म 1 च्या परीक्षेच्या निकालानंतर यावेळी निकाल एकत्रित केला जाणार आहे.
  2. म्हणजे टर्म 1 आणि टर्म 2 च्या दोन्ही परीक्षांचे निकाल त्यात समाविष्ट केले जातील. (CBSE Results 2022)
  3. CBSE बोर्ड टर्म 2 चा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थी अंतिम निकालातून टर्म 1 परीक्षेचा निकाल वजा करू शकतात.

असा पहा निकाल –

  1. CBSE बोर्डाचा इयत्ता 10 वी 12 वीचा निकाल (CBSE Results 2022) पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रथम CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in ला भेट द्यावी लागेल.
  2. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर तुम्हाला 10 वी 12 वीचा निकाल पाहण्यासाठी लिंक सापडतील.
  3. आता तुम्हाला ज्या वर्गाचा निकाल पाहायचा आहे त्यावर क्लिक करा.
  4. क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला रोल नंबर आणि जन्मतारीख टाकून आवश्यक तपशील सबमिट करावा लागेल. (CBSE Results 2022)
  5. तुम्ही सबमिट करताच तुमचा निकाल तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल.
  6. निकाल डाउनलोड करा.
  7. पुढील वापरासाठी निकालाची प्रिंट काढून ठेवा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com