UPSC Success Story : कोण आहे दिव्या शक्ती ? एक अशी IPS ऑफिसर जीने IAS होण्यासाठी दुसऱ्यांदा UPSC क्रॅक केली; वाचा सविस्तर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । दिव्या शक्ती कोण आहे? ती बिहारमधील सारणच्या (UPSC Success Story) जलालपूर जिल्ह्यातील UPSC परीक्षार्थी असून तिने सलग दुसऱ्यांदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पहिल्याच प्रयत्नात, तिने AIR 79 वी रँक मिळवली आणि 2019 मध्ये तिची IPS अधिकारी म्हणून निवड झाली. या यशावर ती समाधानी नव्हती; तिला IAS अधिकारी व्हायचं होतं आणि तिने IAS अधिकारी होण्याचा जणू निर्धार केला. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि तिने यशस्वीरीत्या हि परीक्षा दिली सुद्धा. वाचूया दिव्याचा प्रेरणादायी आणि नवीन अनुभव देणारा प्रवास…

यूपीएससी परीक्षा पास होण्याचं स्वप्न दरवर्षी लाखो विद्यार्थी पाहात. त्यामधील काही निवडक विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण होतं. ही परीक्षा पास झाल्यानंतर मिळेल ती रँक आणि नोकरी घेण्याचा यशस्वी उमेदवारांचा कल असतो. दरवर्षी वाढत जाणारी स्पर्धा पाहाता हा निर्णय योग्यच आहे. त्यानंतरही काही तरूण मिळालेल्या रँकवर (UPSC Success Story) समाधान न मानता आणखी अभ्यास करतात आणि अपेक्षित यश गाठतात. दिव्या शक्ती या तरुणीचीही अशीच गोष्ट आहे. दिव्या यापूर्वी IPS झाली होती. पण त्यानंतरही तिचं समाधान झालं नाही. तिनं पुन्हा एकदा UPSC ची परीक्षा दिली. आता ती IAS बनली आहे.

कसा होता UPSC चा प्रवास

दिव्या शक्ती ही मूळची बिहारमधील जलालपूरची आहे. तिच्या घरात सर्वजण डॉक्टर आहेत. डॉक्टर असलेल्या कुटुंबात जन्मलेली दिव्या ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. तिने मुझफ्फरपूरमधून तिचे हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं आणि तिच्या इंटरमिजिएट अभ्यासासाठी डीपीएस बोकारो इथं गेली. त्यानंतर तिने बिट्स पिलानी मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंगची डिग्री मिळवली. त्यानंतर त्याच कॉलेजमधून अर्थशास्त्रात MSC केलं आणि एका अमेरिकन कंपनीत दोन वर्षे काम केलं. या सर्व अनुभवानंतर दिव्यानं 2019 मध्ये तिने UPSC ची परीक्षा दिली आणि त्यात तिला यश मिळालं.

UPSC करण्याची प्रेरणा कशी मिळाली

दिव्याच्या अवतीभवती तिचे असे काही मित्र होते त्यापैकी काहीजण UPSC देत होते तर काहीजण आणि आधीपासूनच हि परीक्षा पास झाले होते. त्यांच्यामुळे प्रभावित होऊन दिव्यानेही नागरी सेवांमध्ये जाण्याचा विचार केला. पण तरीही तिला UPSC करायचं की अजून काय करायचं हे ठरवता येत नव्हतं. बराच वेळ घेतल्यानंतर दिव्याने UPSC करण्याचा निर्णय घेतला.

दिव्याचा युवा पिढीला सल्ला

युवा पिढीसाठी दिव्या सांगते; की “तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचे हे ठरवण्यास वेळ लागणे चुकीचे नाही. जर तुम्हाला समजत नसेल की तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे तर हे समजून घेण्यासाठी आपण आपला सर्व वेळ जाऊ दिला पाहिजे. घाईघाईने कोणताही निर्णय घेणं योग्य नाही. संयमाने विचार करून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे आणि ते साध्य करण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे.”

IAS बनण्याचं स्वप्न यंदा पूर्ण झालं (UPSC Success Story)

दिव्याने 2019 च्या परीक्षेत AIR 79 वी रँक मिळवली आणि तिची IPS अधिकारी म्हणून निवड झाली. मात्र, तिला IAS अधिकारी व्हायचं होतं. त्यामुळे IPSचं प्रशिक्षण घेत असताना तिने परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि पुन्हा एकदा संघ लोकसेवा आयोगाची २०२१ साली परीक्षा दिली. मुख्य म्हणजे ती यावेळी सुद्धा परीक्षेत पास झाली आणि तिने देशात 58 वी रँक मिळवली. दिव्याने केलेल्या मेहनतीचं फळ तिला मिळालं आणि तिचं IAS बनण्याचं स्वप्न यंदा पूर्ण झालं.

काय म्हणतात दिव्याचे वडील –

दिव्याचे वडील सरकारी मेडिकल कॉलेज आणि (UPSC Success Story) हॉस्पिटल बेतियाचे माजी अधीक्षक आहेत. दिव्या ने मिळवलेल्या यशाबद्दल ते म्हणतात; “दिव्या ही सुरुवातीपासून अभ्यासू आहे. तिने मिळवलेल्या यशामुळे आम्हाला आनंद झालाय. तिला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आहेत. तिने मिळवलेलं यश हे इतर उमेदवारांसाठी प्रेरणा आहे.”

आयएएस होण्याची जिद्द असलेल्या दिव्या शक्तीने (UPSC Success Story) आयपीएस झाल्यानंतरही अभ्यास सुरू ठेवला आणि दुसऱ्यांदा UPSC परीक्षा देत चांगली रँक मिळवत यश संपादन केलंय. तुमच्या मनात काहीतरी करण्याची जिद्द आणि धाडस असेल तर प्रयत्नांती तुम्ही देखील यश मिळवू शकता, आयुष्यातील कोणत्याही टप्प्यात संघर्ष करणाऱ्यांना दिव्याचं हे उदाहरण प्रेरणा देणारं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com