UPSC Success Story: मार्क कमी मिळाले म्हणून शाळेतून काढले; IPS होऊन आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण केले

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | “10 वी चा निकाल पाहून मला शाळेतून काढून टाकण्यात आलं. (UPSC Success Story) पण या घटनेनं मी खचलो नाही तर माझा आत्मविश्वास जागृत झाला आणि कष्टाच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचलो”; हे उद्गार आहेत IPS ऑफिसर आकाश कुल्हरी यांचे. 10 वी च्या परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून आकाश यांना शाळेतून काढण्यात आले होते. पण अभ्यासात सातत्य ठेवून त्यांनी IPS पदापर्यंत मजल मारली आहे. आकाश 2006 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. पाहूया या मुलाच्या प्रवासाविषयी…

मार्क कमी मिळाले म्हणून शाळेतून काढून टाकले – 

आकाश एका खासगी शाळेत शिकत होते. त्यांची शिक्षणातील प्रगती सुधारत नव्हती. 10 वी च्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. सुरुवातीला अभ्यासापेक्षा खेळण्यात जास्त लक्ष दिल्याचे सत्य त्यांनी स्विकारले. पदवी घेण्यापूर्वी त्यांच्यापुढे कोणतेही लक्ष्य नव्हते. परंतु,त्यानंतर त्यांनी आपले लक्ष्य ठरवले आणि त्यात यश मिळवले. एका मुलाखतीत आकाश सांगतात की, “मी अगदी सामान्य मुलगा होतो. इयत्ता 10 वी चा निकाल पाहून मला शाळेतून काढून टाकण्यात आलं. पण या घटनेनं माझा आत्मविश्वास जागृत झाला आणि कष्टाच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचलो.”

पहिल्याच प्रयत्नात IPS – (UPSC Success Story)

आकाश कुल्हारी हे राजस्थानच्या बिकानेर येथील रहिवासी आहेत. बिकानेर केंद्रीय विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले आहे. यावेळी कठोर मेहनत घेत आकाश यांनी इंटरमिजिएट परीक्षेत 85 टक्के गुण मिळवले. 2001 मध्ये पुढील शिक्षण त्यांनी दुग्गल महाविद्यालयातून घेत कॉमर्समध्ये पदवी मिळवली. त्यानंतर जेएनयू दिल्ली येथील स्कूल ऑफ सोशल सायन्सेसमध्ये एम.कॉम केले. याच दरम्यान त्यांनी UPSC चा अभ्यास सुरु केला. तसेच 2005 मध्ये एम.फील पण पूर्ण केले. मार्क कमी मिळाले म्हणून शाळेतून काढून टाकण्यात आलेले आकाश 2006 मध्ये UPSC ची परीक्षा पास झाले ते ही पहिल्याच प्रयत्नात.

आई – वडीलांची इच्छा पूर्ण केली…

आकाश सांगतात; “पदवीनंतर माझ्यासमोर करिअरचे दोन पर्याय होते. (UPSC Success Story) पहिला म्हणजे मी MBA करून कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करावी आणि दुसरा पर्याय म्हणजे नागरी सेवांची तयारी करणे. माझ्या मुलांनी अधिकारी होऊन देशसेवा करावी, अशी माझ्या आई – वडीलांची इच्छा होती, त्यामुळे आईच्या इच्छेचा मान राखून मी नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्यावर लहान भावाने देखील हाच मार्ग निवडला, तोही आज उच्च पदस्थ अधिकारी आहे.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com