मोठी बातमी : UPSC चे माजी सदस्य अन् कुलगुरू 5 लाखांची लाच घेताना रंगेहात सापडले; ACB ने घरी छापा टाकला तेव्हा…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

जयपूर (राजस्थान)। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जयपूरमध्ये एक मोठी कारवाई केली आहे. कोटा तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रामावतार गुप्ता यांना 5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय. कोटा तांत्रिक विद्यापीठाच्या अखत्यारित तब्बल 300 महाविद्यालये येतात. यातीलच एका महाविद्यालयात इंजिनीअरिंगच्या जागा वाढवण्यासाठी गुप्ता यांनी लाच मागितली होती. यातील 5 लाखांची लाच स्विकारताना सरकारी गेस्ट हाऊसमधून त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. गुप्ता यांच्या अटकेमुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे.

कोण आहेत रामावतार गुप्ता-

गुप्ता यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे आणि राजस्थान लोकसेवा आयोगाच्या निवड समितीचे सदस्य राहिले आहेत. सध्या ते राजस्थानमधील कोटा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार सांभाळत आहेत.

का झाली कारवाई-

इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जागा वाढवण्याच्या मागणीसाठी कुलगुरू डॉ. रामावतार गुप्ता यांनी सुमारे 21 लाख रुपये लाच मागितली होती. एसीबी पथकाचे डीजी बी. एल. सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार रामावतार गुप्ता एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जागा वाढविण्यासाठी लाच मागत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचला आणि गुप्ता यांना पाच लाखांची लाच घेताना सरकारी गेस्ट हाऊसमधून रंगेहात अटक करण्यात आली.

गुप्ता यांच्या घरातून निघाले घबाड-

एसीबीच्या पथकाने रामावतार गुप्ता यांच्या निवासस्थानी केलेल्या छापेमारी दरम्यान मोठे घबाड हाती लागले आहे. अधिकाऱ्यांना तपासात 3 लाख 64 हजार रुपये रोकड, अर्धा किलो सोनं, 6.69 किलो चांदी जप्त केली आहे. यासोबतच रामावतार आणि त्यांच्या पत्नीच्या नावावरील एकूण 18 बँकांमधील विविध खात्यांमधून अंदाजे 68 लाख 72 हजार रुपये रोकड मिळाली आहे.

याशिवाय रामावतार यांचा मुलगा, मुलगी आणि सुनेच्या 7 बँक खात्यांमध्ये 10 लाख 84 हजार रुपये सापडले आहेत. तसेच गुप्ता यांच्या नावावर एक फ्लॅट आणि जमीन तर त्यांच्या पत्नी आणि पत्नीच्या बहिणींच्या नावावर 11 प्लॉट असल्याची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com