Mustafa PC Success Story : कधीकाळी रोजचं जेवण देखील मिळत नव्हतं; पण आज आहे 730 कोटींच्या कंपनीचा मालक…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | जगात अशक्य असं काहीच नाही. जिद्द असेल तर अशक्यही शक्य होऊ शकतं. (Mustafa PC Success Story) एक व्यक्ती आहे ज्यानं स्वप्न बघितलं आणि ते आपल्या जिद्दीनं पूर्ण करून दाखवलं. कधीकाळी मजुरी करून अवघे दहा रुपये कमावणाऱ्या व्यक्तीनं आज 730 कोटींची कंपनी उभी केली आहे. हि व्यक्ती आहे मुस्तफा पीसी. मुस्तफा यांचा जन्म केरळमधील एका दुर्गम गावात झाला. त्यांचे वडील रोजंदारीवर मजूरी करत होते. मुस्तफा स्वतः कामावर जात असत. मात्र आपल्या मुलानं चांगलं शिकावं असं वडिलांना वाटत होतं. मात्र शालेय शिक्षण घेत असताना सहावीच्या वर्गात मुस्तफा नापास झाले आणि त्यांनी शाळेत जाणं बंद केलं.

मुस्तफा एका मुलाखतीत म्हणतात, “आम्हाला फक्त 10 रुपये रोजंदारी मिळत होती. त्यावेळी दिवसातून तीन वेळचं जेवण करणं हे आमच्यासाठी एक स्वप्नच होतं. त्यामुळे मी स्वतःला सांगितलं होतं की आता शिक्षणापेक्षा पोट भरणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे शिक्षण सोडलं. मात्र एका शिक्षकांनी मला पुन्हा शिक्षण सुरु करण्याचा सल्ला दिला आणि मला मोफत शिक्षणही दिलं. मी गणित विषयात टॉप केलं आणि शाळेत नेहमीच मी अव्वल राहिलो. ज्यावेळी कॉलेजमध्ये जाण्याची वेळ अली त्यावेळी या शिक्षकांनीच माझी फी भरली त्यामुळेच मी कॉलेज पूर्ण करू शकलो..”Mustafa PC Success Story

आपल्या करिअर विषयी बोलताना मुस्तफा म्हणतात; “जेव्हा मला पहिल्यांदा नोकरी मिळाली तेव्हा मला चौदा हजार रुपये पगार होता. मी माझ्या वडिलांना पगार आणून दिला तेव्हा माझे वडील रडू लागले. कारण ते पैसे त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या कमाईपेक्षा अधिक होते असंही मुस्तफा म्हणाले.”

ID FOODS सुरु करण्याची आयडिया अशी आली-

मुस्तफा यांनी सुरु केलेल्या कंपनीचा प्रवास रोमांचक आहे. ID FOODS या नावाने मुस्तफा कंपनी चालवतात. एकदा मुस्तफा यांनी आपल्या चुलत भावाला मळक्या पाकिटातून इडलीचं पीठ विकताना बघितलं. पीठ विकत घेणारा ग्राहक पिठाच्या क्वालिटीवरून मुस्तफा यांच्या भावाशी भांडत होता. त्यावेळीच मुस्तफा आणि त्यांच्या भावाला ग्राहकाला उत्तम क्वालिटीचं बॅटर देणारी एक फूड कंपनी उघडण्याची आयडिया आली. हि कंपनी डोसा, इडली, उडीद वडा यांचे रेडी तू कुक बॅटर तयार करून विकते. या तयार बॅटर सह वेगवेगळ्या प्रकारचे रेडी टु कुक पराठे आणि फिल्टर कॉफी तुम्हाला मिळते ज्या कॉफीत दूध ओतलं कि ती कॉफी पिण्यासाठी तयार होते.

 

अशी झाली ID FOODS ची सुरुवात (Mustafa PC Success Story)

50 हजाराच्या गुंतवणुकीतून मुस्तफा यांनी कंपनी सुरु केली. ५० बाय ५० च्या स्वयंपाकाच्या खोलीत ग्राइंडर, मिक्सर आणि वजन करणाऱ्या मशीनसह त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना दिवसाला १०० पाकिटे विकायला ९ महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर कंपनीकडे मागणी वाढत गेली. वाढती मागणी लक्षात घेऊन मुस्तफा यांनी संपूर्ण वेळ कंपनीला देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. कंपनीचा व्याप वाढत असताना एकदिवस असा आला, कि कंपनी कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नव्हती. अशावेळी मुस्तफा यांनी नोकरी सोडून निघालेल्या २५ कर्मचाऱ्यांना कंपनीसोबत काम करण्याची विनंती केली. त्याबदल्यात प्रत्येकाला करोडपती बनवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मुस्तफा यांनी मेहनत घेऊन गुंतवणूकदारांकडून कंपनीत गुंतवणूक केल्यामुळे रात्रीत कंपनीचं नशीब पालटले. मुस्तफा यांनी दिलेला शब्द खरा ठरला. जे कर्मचारी कंपनीसोबत एकनिष्ठ राहिले ते सगळे आज करोडपती आहेत. आज मुस्तफा हे 730 कोटींच्या कंपनीचे मालक आहेत. इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष तरुणांसाठी प्रेरणादायी आहे

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com