युपीएससी न देता बना केंद्रात वरिष्ठ अधिकारी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट |युपीएससी पास होऊन मोठा अधिकारी बनून देश सेवा करणे हे खूप तरूणांच स्वप्न असत, पण प्रत्येकाचं ते स्वप्न पूर्ण होऊच शकेल अस नाही. त्याला बरीच कारण असू शकतात बुद्धिमता, ज्ञान असून संधीच्या अभावामुळे त्या स्वप्ना पर्यंत न पोहचलेले बरेच जन असतील पण आता हि देखील खंत युपीएससी दूर करेल. युपीएससी पास न होता देखील तुम्हाला केंद्र सरकार मध्ये काम करता येणार आहे.

तुमच्याकडे जर या क्षेत्रातील अनुभव असेल तर तुम्हाला केंद्रात सरकारी अधिकरी होता येणार आहे. यासाठी केंद्र सरकार लवकरच जाहिरात काढणार आहे. नीती आयोग सध्या ४४ जागांसाठी अर्ज मागवणार आहे. त्यानंतर योग्य उमेदवारांच्या पात्रतेनुसार त्याची या पदावर नेमणूक केली जाईल. मात्र केंद्र सरकारकडून या पदासाठीची हि नेमणूक कंत्राटी पद्धतीने असणार आहे. त्यानंतर त्या उमेदवाराला पगाराच्या रूपात महिन्याला १ लाख ५ हजार रुपये मिळणार आहेत.

या निवडप्रक्रियेत उमेदवाराच्या शिक्षणापेक्षा त्याच्या अनुभवाला प्राधान्य दिले जाणार आहे. नीती आयोगाचे सल्लागार अलोक कुमार यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. त्याचबरोबर या साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे २६ ते ३५ च्या आत असावे. याविषयी अधिक माहिती तुम्हाला नीती आयोगाच्या वेबसाईटवर मिळणार आहे.