अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार का? मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर उदय सामंत म्हणतात…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा जून महिन्यातही बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असताना उच्च शिक्षण खात्या अंतर्गत येणाऱ्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार का याबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी १२:३० वाजता सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा चर्चा केली. या चर्चेत काय निर्णय घेण्यात आला याबाबत आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.

अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा आपण राखून ठेवल्या होत्या. त्या घ्यायच्या कि घ्यायच्या नाहीत याबाबत राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कुलगुरूंशी जवळपास दोन तास चर्चा केली. या चर्चेत उच्च शिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी आणि खात्याचे मुख्य सचिव यांचाही समावेश होता. त्यानंतर आम्ही निर्णयाप्रती आलो आहोत. विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय आम्ही करू. येत्या दोन दिवसांत आम्ही सदर निर्णय जाहीर करू अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी थोडा संयम ठेवणे गरजेचे आहे. सर्व अंतिम वर्षांचे निकाल कसे लावणार याबाबतही येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू म्हणूनच सरकारकडून निर्णय घेतला जाईल. असंही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले आहे.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com