सचिनचे वडील UPSC च्या विद्यार्थ्यांना मराठी लिटरेचर शिकवायचे; IPS अधिकार्‍याने सांगितली आठवण

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तेलंगणातील राचकोंडा जिल्ह्याचे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांनी आपल्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्या क्षणाची आठवण त्यांनी सांगितली आहे. त्यांची आणि सचिनची भेट किती महत्वपूर्ण आणि भावनिक होती हे त्यांच्या फोटोखालील आशयाने लक्षात येते. त्यांचे आणि सचिन सोबत असणारे विशेष नातेही त्यांनी या पोस्टद्वारे सांगितले आहे. हैद्राबाद येथील उप्पल क्रिकेट मैदानावर २२ मे २०१७ रोजी ते सचिनला भेटले होते.

महेश भागवत यांनी त्यांची यूपीएससीची तयारी मुंबई येथे केली होती. त्या काळातली एक विशेष आठवण त्यांनी शेअर केली. सचिनचे वडील प्रसिद्ध कादंबरीकार रमेश तेंडुलकर यांच्याकडून महेश भागवत यांनी मराठी विषयाचे धडे घेतले आहेत. त्यामुळे सचिनची भेट झाल्यावर रमेश तेंडुलकर यांच्या आठवणी जाग्या झाल्या. यावेळी तो भावुक झाल्याचे त्यांनी त्यांच्या पोस्टद्वारे सांगितले. हैद्राबाद मध्ये आयपीएल च्या अंतिम सामन्याच्या वेळी दोघांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान त्यांनी मुंबई इंडियन्स च्या विजयासाठी त्याचे अभिनंदन केल्याचेही त्यांनी लिहिले आहे.

WhatsApp Image 2020-05-23 at 6.31.40 PM

रमेश तेंडुलकर हे मराठीतील ख्यातनाम कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. मुंबईत यूपीएससीची तयारी करीत असताना महेश भागवत यांनी एसआयएसी मध्ये १९९३-९४ च्या दरम्यान त्यांनी रमेश तेंडुलकर यांच्याकडून मराठीचा पाठ घेतला होता. सचिनसोबत भेट म्हणजे रमेशजींच्या आठवणीचा उजाळाही होता. अशा पद्धतीने त्यांचे व सचिनचे विशेष नाते त्यांनी शेअर केले आहे.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com