मुंबई | नाॅबेल कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेत महाराष्ट्र लोकसेवा अायोगाकडून २६ एप्रिल रोजी नियोजित असणारी राज्यसेवा पूर्वपरिक्षा आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. यापूर्वी ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरिक्षा २६ एप्रिल रोजी घेतली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र आता कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सदर परिक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक काढून सदर निर्णयाची माहिती दिली आहे. राज्यसेवा पूर्चपरिक्षा तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत पूर्व परिक्षा या दोन्ही परिक्षांच्या नियोजित तारखांमध्ये बदल करण्यात आला असून लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर परिक्षेची सुधारित तारिख कळवण्यात येईल असे आयोगाने म्हटले आहे.
२६ एप्रिल रोजी नियोजित असलेली राज्यसेवा पूर्वपरिक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर#MPSC #MPSCPrelims2020 #Careernama #करिअरनामा @VarshaEGaikwad @RRPSpeaks pic.twitter.com/kqRjkBY76X
— Careernama (@careernama_com) April 7, 2020
दरम्यान, सुधारित तारिख सर्व अर्जदारांना मोबाईलवर संदेश पाठवून कळवण्यात येईल अशी माहितीही आयोगाने दिली आहे. विद्यार्थ्यांनी आयोगाच्या संकेतस्थळाला वरचेवर भेट देऊन माहिती मिळवणे हे हिताचे राहिल असेही या परिपत्रकात म्हटले आहे.
नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 7821800959 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com