विद्यापीठांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही लवकरच ‘वर्क फ्रॉम होम’- शिक्षण मंत्री उदय सामंत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी द्यावी अशी विनंती शिक्षकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या फैलावाच्या खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठातील प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होम (पेपर तपासणी) करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

राज्यसरकारने सर्व शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यापीठाचे कुलुगुरु, कुलसचिव,प्राचार्य यांनी नियमित कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असल्याने कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागते. शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. कोरोना बाबत गैरसमज करून घेऊ नये. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन शैक्षणिक परिस्थिचा अभ्यास करून शिक्षकानं प्रमाणे कर्मचाऱ्यांना ही वर्क फ्रॉम होम करण्यास निर्णय घेतला जाईल. असेही उदय सामंत यांनी सांगितले.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून प्राध्यपकांना ‘वर्क फ्रॉम होम ‘ ची परवानगी देण्यात आली आहे. तसेच शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनाही परवानगी देण्याबाबत शासन निर्णय घेईल, असे आवाहनही  केले आहे.

नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob” visit : www.careernama.com