कोरोना इफेक्ट : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । पुण्यामध्ये कोरोनाव्हायरसने आपला विळखा आवळायला सुरुवात केली आहे. राज्यभरात संसर्गजन्य रोगाची लागण होऊ नये यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असताना पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. असं असलं तरी दहावीच्या परीक्षा वेळापत्रकात काहीही बदल होणार नसल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

पुण्यात कोरोनाचे दहा रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे शुक्रवारी घेण्यात आलेल्या या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी शनिवारपासून होणार आहे. पुणे, मुंबई, ठाणे याठिकाणी असणारे स्विमिंग पूल ,सिनेमागृहे, जिम, जलतरण तलाव देखील आज मध्यरात्रीपासून बंद राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी केलेल्या विधानात कोरोनाची साथ असली तरी शाळा बंद ठेवाव्या लागणार नाहीत असं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र पुणे, मुंबईसह ठाणे भागात कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव पाहून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”