करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल (8 Th Pay Commission) नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता नव्या सरकारकडून नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांवर खुश होईल; असा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवे सरकार आल्यावर आता आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू होऊ शकते. परंतु या संबंधित कोणतीही ठोस माहिती हाती आली नाही. पुढील वर्षापर्यंत नवे सरकार मोठी घोषणा करू शकते; अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पावसाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता
केंद्र सरकार पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करू शकतात, अशी माहिती आली आहे. आतापर्यंत आठवा वेतन आयोग येणार नाही, अशी चर्चा होती. परंतु पुढील वेतन आयोगाची तयारी सुरू होईल; अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सरकारने याबाबत अजून कोणतेही विधान केले नाही. परंतु या नव्या चर्चांना आता उधाण आले आहे. पावसाळी अधिवेशनात त्यावर चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
किती पगार वाढणार (8 Th Pay Commission)
सरकारने जर आठवा वेतन आयोग लागू केला, तर पगारात मोठी वाढ होऊ शकते. याबाबतचे नियोजन आयोग देखील स्थापन करण्यात येणार असून अर्थ मंत्रालयाकडे ही जबाबदारी जाणार आहे, अशी चर्चा सुरु आहे. यानंतरच कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबाबत निर्णय घेऊ शकतो. सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगाचे सगळं काही सुरक्षित झाले, तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात खूप मोठी वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर 3.68 पटीने वाढणार आहे; त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 44.44% वाढ होऊ शकते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com