7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! महागाई भत्त्यात होणार ‘एवढी’ वाढ

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने (7th Pay Commission) एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. सध्या या नोकरदार वर्गाला 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू झाली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2024 पासून सुधारित होणार आहे.

जुलैपासूनच्या महागाई भत्त्यात एवढी वाढ होणार
एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता ठरवला जातो. जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरवला जाणार आहे. जुन 2024 पर्यंतची ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांची आकडेवारी केंद्रीय कामगार मंत्रालयांकडून नुकतीच जाहीर (7th Pay Commission) करण्यात आली आहे. यामुळे आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता कितीने वाढणार हे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून जारी झालेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार जुलैपासूनचा महागाई भत्ता हा 53.44% एवढा होणार आहे. मात्र प्रत्यक्षात महागाई भत्त्यात तीन टक्क्यांचीच वाढ होणार आहे म्हणजे हा भत्ता 53% एवढा होणार आहे. असे असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबतचा निर्णय हा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

कॅबिनेटच्या बैठकीत होणार निर्णय (7th Pay Commission )
ऑक्टोबर महिन्यात केंद्रातील मोदी सरकार कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक घेईल आणि यामध्ये महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना ५३ टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे.

जानेवारी ते जून महिन्याची SICPI आकडेवारी अशी आहे
– जानेवारी महिन्यात एआयसीपीआयचे निर्देशांक 138.9 होते अन महागाई भत्ता दर 50.84% होते.
– फेब्रुवारीमध्ये हे निर्देशांक १३९.२ अन (7th Pay Commission) महागाई भत्ता दर 51.44% होते. मार्च महिन्यात हे निर्देशांक 138.9 अन महागाई भत्ता दर 51.95% होते.
– एप्रिल महिन्यात हे निर्देशांक 139.4 अन महागाई भत्ता दर 52.43% होते.
– मे महिन्यात हे निर्देशांक 139.90 अन DA दर 52.91 एवढे होते.
– जून महिन्यात निर्देशांक 141.4 अन महागाई भत्ता दर 53.44% एवढे होते.

फरकाची रक्कमही मिळणार
हा भत्ता जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने ऑक्टोबर (7th Pay Commission) महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com