3 Year Law CET Exam Date 2024 : तीन वर्षे कालावधीच्या LLB प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । LLB प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत (3 Year Law CET Exam Date 2024) महत्वाची अपडेट हाती आली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने 5 वर्षे लॉ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता 3 वर्षे लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना दि. 11 जुलैपासून प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी दि. 29 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

इथे पहा वेळापत्रक –
सीईटी सेलच्या (CET Cell) माध्यमातून व्यवसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध (3 Year Law CET Exam Date 2024) करण्यात आले आहे. त्यानुसार तीन वर्षे लॉ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया गुरुवार दि. 11 जुलैपासून सुरू केली जाणार आहे. विद्यार्थी या https://llb3cap24.mahacet.org/Public/Notifications.aspx?NotificationCategoryID=4 या संकेतस्थळाला भेट देवून प्रवेशाचे वेळापत्रक पाहू शकतात.

प्रवेश नोंदणी संदर्भात महत्वाच्या तारखा (3 Year Law CET Exam Date 2024) –
1. विद्यार्थ्यांना 11 जुलै ते 18 जुलै या कालावधीत प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे.
2. विद्यार्थ्यांनी अपलोड केलेल्या कागदपत्रांची तपासणी 11 जुलै ते 21 जुलै या कालावधीत करण्यात येणार आहे.
3. सीईटी सेल तर्फे येत्या 23 जुलै रोजी प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
4. विद्यार्थी 23 ते 26 जुलै या कालावधीत अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतात.
5. प्रवेशाची पहिली अंतिम गुणवत्ता यादी येत्या 29 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सीईटी सेलतर्फे परिपत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com