12th Board Exam Results 2024 : 12 वीचा निकाल नेमका कधी? मार्कलिस्ट कधी मिळणार? वाचा सविस्तर…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्य मंडळाच्या नऊ विभागीय (12th Board Exam Results 2024) मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत इयत्ता 12 वी ची परीक्षा घेण्यात आली होती. आता परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. यावर्षी राज्यभरातून तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी 5 व्या टप्यातील मतदान सुरु आहे. आज (20 मे) सायंकाळी मतदान संपले की निकालाची तारीख जाहीर केली जाऊ शकते; व उद्या (21 मे) निकाल लागू शकतो; अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

गेल्या वर्षी राज्य मंडळाने बारावीचा निकाल २५ मे रोजी, तर दहावीचा निकाल २ जून रोजी जाहीर केला होता. मात्र यंदा गेल्यावर्षीपेक्षाही लवकर निकाल जाहीर करण्याची तयारी असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मिडियावर अशीही चर्चा रंगली आहे की आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा व शेवटचा टप्पा पार पडताच निकाल जाहीर केला जाईल.

12 वीचा निकाल नेमका कधी? (12th Board Exam Results 2024)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत स्पष्टीकरण देत बोर्डाच्या वतीने अधिसूचना सुद्धा जारी केली होती. राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल मे अखेरीस जाहीर करण्याचे नियोजन आहे, असे सांगण्यात आले होते. यानुसार अगदी २१ मे तारीख नक्की नसली तरी आजपासून सुरु झालेल्या आठवड्यात निकाल समोर येण्याची नक्कीच शक्यता आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट –
1. hscresult.mahahsscboard.in
2. mahahsscboard.in
3. maharesult.nic.in

निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा –
1. प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
2. यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC and HSC result साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
3. आता तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख किंवा (12th Board Exam Results 2024) आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
4. यानंतर Maharashtra board 10th and 12th results 2024 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
5. यानंतर निकालाची प्रिंट काढून घ्या.

विद्यार्थ्यांना मार्कलिस्ट कधी मिळणार?
मागीलवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा निकालाच्या तारखेनंतर साधारण 10 दिवसात विद्यार्थी त्यांच्या संबंधित कॉलेजमधून निकालाची प्रत मिळण्याबाबत चौकशी करू शकतात. याशिवाय बोर्डाकडून निकाल जाहीर करताना सुद्धा याविषयी माहिती देण्यात येईल.
ATKT परीक्षा कुणाला व कधी द्यावी लागणार?
गेल्या वर्षी तब्बल ३३,३०६ विद्यार्थ्यांना ATKT परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली होती. ही परीक्षा दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात तात्पुरते प्रवेश घेण्याची परवानगी देते मात्र पुढे जाण्याआधी त्यांना हे विषय उत्तीर्ण व्हावे लागतात. साधारण ऑक्टोबरमध्ये ATKT परीक्षा होतात. महाराष्ट्र बोर्डाच्या (12th Board Exam Results 2024) परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या निकषांना जे विद्यार्थी पूर्ण करत नाहीत त्यांना ही परीक्षा द्यावी लागते. या निकषांमध्ये एकच नियम आहे तो म्हणजे थेअरी व प्रात्यक्षिक परीक्षा मिळून विद्यार्थ्याने 35 टक्के गुण मिळवावे लागतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com