12th Board Exam Results 2024 : उद्या 12 वी चा निकाल; मार्कशीट डाऊनलोड करण्यासाठी ‘या’ गोष्टी आवश्यक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (12th Board Exam Results 2024) शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल दि. 21 मे (मंगळवार) रोजी जाहीर होणार आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत 12 वी बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल विद्यार्थी शिक्षण मंडळाच्या https://mahresult.nic.in/ अधिकृत वेबसाइट किंवा अन्य वेबसाइटवरून पाहू शकता. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाचे तपशील विचारले जातात, जे भरल्यानंतर निकाल पाहता येईल. या तपशीलाविषयी आणि निकाल कसा पहायचा याबद्दल सविस्तर जाणून घेवूया…

कुठे पाहता येईल निकाल – (12th Board Exam Results 2024)
1. MSBSHSE ने आपल्या अधिकृत नोटीसमध्ये काही वेबसाइट्सचा उल्लेख केला आहे, ज्यावर HSC 2024 चा निकाल पाहता येईल. विद्यार्थी या वेबसाइट्सना भेट देऊ शकतात आणि सर्व माहिती भरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
2. विद्यार्थी एसएमएस सेवेचाही वापर करून निकाल पाहू शकतील.
3. इयत्ता १२ वीचा निकाल डिजिलॉकरवरदेखील उपलब्ध असेल, जो विद्यार्थी ॲपमध्ये लॉग इन करून डाउनलोड करू शकतात.

१२ वीचा निकाल पाहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
1. विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट, डिजिलॉकर आणि एसएमएस सेवेद्वारे पाहू शकतात.
2. निकाल तपासण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना १२ वीचे प्रवेशपत्र स्वतः जवळ ठेवणे आवश्यक आहे .
3. ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र HSC बोर्ड परीक्षेचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करावे लागते, त्यानंतरच स्क्रीनवर तुम्हाला निकाल दिसेल. (12th Board Exam Results 2024)
4. काही वेबसाइट्सवर तुम्हाला रोल नंबरसह शाळेचा कोड आणि इतर माहिती विचारली जाते. ही माहिती भरून सबमिट केल्यानंतरच तुम्हाला निकाल पाहता येतो.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट –
1. https://mahresult.nic.in/

2. https://results.digilocker.gov.in
3. http://results.targetpublications.org
4. http://hscresult.mkcl.org
5. http://www.mahahsscboard.in

निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो –
1. https://mahresult.nic.in/ या किंवा वर दिलेल्यापैकी बोर्डाच्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.
3. त्यानंतर HSC Examination Result वर क्लिक करा.
4. आता तुम्हाला एका नव्या विंडोवर (12th Board Exam Results 2024) रिडीरेकट केलं जाईल, तिथे तुम्हाला रोल नंबर आणि आईचं नाव टाईप करावं लागेल.
5. त्यापुढे View Result वर क्लिक करा.
6. निकाल तुमच्या स्क्रिनवर असेल.
7. पुढील वापरासाठी निकालाची प्रिंट घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com