12th Board Exam Results 2024 : सर्वात मोठी बातमी!! 12 वी चा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 93.37%; यंदाही मुलींनी मारली बाजी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (12th Board Exam Results 2024) शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यात यंदा बारावीचा निकाल 93.37% लागला आहे. सर्वाधिक म्हणजे 97.51% निकाल कोकण विभागाचा, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी निकाल 91.95% लागला आहे; राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर या वेळी उपस्थित होते.

यंदाही निकालात मुलींचीच बाजी (12th Board Exam Results 2024)
यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. यावर्षी ९२.६० टक्के मुले, तर ९५.४९ टक्के मुली पास झाल्या आहेत. यंदा निकालाचा टक्का वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थी तसेच पालकांना आज दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येईल. विद्यार्थ्यांना mahahsscboard.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.

१५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
यावर्षी बारावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी तीन लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३७ हजार २२६, आयटीआयसाठी चार हजार ७५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की 12 वीची 6 माध्यमांतील 154 विषयांची परीक्षा घेण्यात आली. या अंतर्गत परीक्षेचे गुण ऑनलाइन घेतल्यामुळे निकाल लवकर जाहीर (12th Board Exam Results 2024) होण्यास मदत झाली. परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांची संख्या घटली आहे. राज्यस्तरावर २७१ भरारी पथके नेमण्यात आली होती, तसेच जिल्हा स्तरावरही स्वतंत्र भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती.

या वेबसईट्स वर पाहता येईल निकाल
१. mahresult.nic.in
२. http://hscresult.mkcl.org
३. www.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. www.tv9marathi.com
६. http://results.targetpublications.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com