करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना बोर्डाच्या (10th and 12th Board Exam Results) परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच इयत्ता 10 वी आणि 12 वी चा निकाल जाहीर करणार आहे. 10वी आणि 12 वीचे विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. १० वी आणि १२ वीचा निकाल पाहताना विद्यार्थ्यांकडे त्यांचा रोल नंबर असणे आवश्यक आहे.
निकालाची संभाव्य तारीख (10th and 12th Board Exam Results)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता १२ वीचा निकाल मे २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता आहे. यामध्ये काही कारणास्तव बदलही होऊ शकतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावी २०२४ च्या कॉमर्स, आर्टस आणि (10th and 12th Board Exam Results) सायन्स या विषयांचा निकाल जाहीर करेल. महामंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्याअगोदर 10 वीचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे १, २ आणि ३ जून यापैकी एका तारखेला निकाल जाहीर होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com