10 वी, 12 वी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; पहा महत्वाचे मुद्दे

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई | कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर दहावी, बारावीच्या परिक्षा कशा होणार याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम अवस्था आहे. यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. दहावी, बारावीच्या परिक्षा आॅफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच यंदाची परिक्षा अर्धा तास अगोदर सुरु होणार असून विद्यार्थ्यांना जादाचे ३० मिनिट दिले जाणार आहेत.

महत्वाचे मुद्दे –

  • इ. 10 वी ची लेखी परीक्षा 29/04/2021 ते 20/05/2021 या कालावधी मध्ये ऑफलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहे.
  • इ. 12 वी ची परीक्षा दि.23/04/2021 ते 21/05/2021 कालावधी मध्ये ऑफलाईन पध्दतीने लेखी परीक्षा होईल.

परीक्षा केंद्रे

  • कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येतील.
    अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल.

परीक्षेची वेळ

  • दरवर्षी 80 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी 3 तास वेळ दिला जात असे. परंतु यावर्षी विद्यार्थ्याचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर 40 व 50 गुणांच्या परिक्षेसाठी 15 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे.
  • परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घडयाळी तासा साठी 20 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.

प्रात्यक्षिक परीक्षा

  • इ. 10 वी च्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जात असत परंतु या वर्षी कोविड-19 परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य (Assignment) गृहपाठ पध्दतीने घेण्यात येतील.
  • प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पध्दतीने 21/05/2021 ते 10/06/2021 या कालावधीत सादर करण्यात यावेत.
  • इ. 12 वी च्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा दि. 22/05/2021 ते 10/06/2021 या कालावधीत होतील.
  • कोविड -19 च्या परिस्थिती मुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे 12 वी च्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून 5 ते 6 प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल.
  • कला/वाणिज्य/ व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परिक्षेनंतर 15 दिवसात Assignment सादर करावेत.
  • इ.10 वी व 12 वी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी मध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषयक परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा Assignment सादर करण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल.

विशेष परीक्षेचे आयोजन

  • एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जुन महिन्यामध्ये करण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.

पुरवणी परीक्षा

  • परीक्षा मंडळा मार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट मध्ये घेण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.

सुरक्षात्मक उपाय योजना

  • परीक्षेसंदर्भात शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय, केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबी साठी स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येतील.
  • कोविड-19 बाबत केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्र निर्गमित करण्यात येतील
  • सर्व विद्यार्थ्यांना / पालकांना आवाहन करण्यात येते की राज्यमंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजण्यात यावी.

इ.10 वी व 12 वी परीक्षेसाठी नियुक्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोविड-१९ ची लस देण्याचा विचार शिक्षण विभाग करीत आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com