करिअरनामा ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी (Free Education) सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून EWS, SEBC आणि OBC विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींचे 100 टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
‘या’ मुलींसाठी घेण्यात आला निर्णय
राज्य सरकारने नुकतंच मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा (Free Education) केली होती. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींची संख्या वाढावी या उद्देशाने राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला होता. यानंतर राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी घेण्यात आला आहे.
100 टक्के फी माफ (Free Education)
व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग(SEBC) तसेच इतर मागास प्रवर्गातील (OBC) मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये 50 टक्के ऐवजी आता 100 टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर करण्यात आली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे EWS, SEBC आणि OBC विद्यार्थीनींच्या कुटुंबियांना मिळालेला मोठा दिलासा आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com