मराठा समाजातील मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के EWS आरक्षणाचा मिळणार लाभ

करिअरनामा ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर, मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी आणि आरक्षणावरून तापलेले वातावरण शांत करण्यासाठी ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा समाजातील मुलांना शिक्षण आणि नोकरीसाठी पात्र उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात १० टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवारांना आरक्षणाचा १० टक्के लाभ घेता येणार आहे. असा निर्णय राज्य सरकारने लागू केला आहे.

मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासून, राज्यात हा मुद्दा खूप चर्चेचा आणि संवेदनशील बनत चालला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यासोबतच, विरोध पक्ष भाजपाकडून ठाकरे सरकारला या मुद्द्यावरून सुरवातीपासूनच धारेवर धरलं जात आहे. मराठा समाजातूनही सरकारबद्दल नाराजीचा सूर असून, ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणीही होत होती. अखेर राज्य सरकारकडून याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवार (दिनांक 31 मे) रोजी राज्य सरकारने याबद्दलचा आदेश काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असल्याचं बोललं जात आहे. यामुळे निश्चितच मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये १० टक्के EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com