कोयंबतूर येथील एका 19 वर्षीय मुलीची परीक्षेच्या भीतीने आत्महत्या

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

कोयंबतूर । राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. याच्या दुसर्‍याच दिवसानंतर मंगळवारी कोयंबतूर मधील एका 19-वर्षीय मुलीने पेपर देण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएस पुरम येथील व्यंकटसामी रोड (पूर्व) येथील आयटीआय कर्मचाऱ्याची मुलगी असलेली आर. सुभाश्री मागील दोन वर्षांपासून वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होती. ती 2019 मध्ये परीक्षेला बसली होती मात्र वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरण्यासाठी तिला किमान कट ऑफ गुण मिळू शकले नाही. त्यामुळे यावर्षी परीक्षेत चांगले गुण मिळवण्याच्या निर्धाराने ती जोरदार तयारी करत होती आणि त्याच परिसरातील एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये दाखलही झाली होती.

मंगळवारी सकाळी 11.00 च्या सुमारास ती तिच्या खोलीत गेली आणि तिने स्वत: ला लॉक केले. चार तासांपेक्षा जास्त काळ झाला तरी मुलगी बाहेर येत नसल्याने तिच्या पालकांनी दार ठोठावले. मात्र त्यांना आतून कोणताही प्रतिसाद न मिळाला नाही. त्यानंतर तिचे नातेवाईक आणि पालकांनी मिळून दरवाजा तोडला. पण आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांना ती मुलगी तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

आर एस पुरम पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन कोयंबतूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी पाठविला. पोलिसांनी कलम 174 (आत्महत्येची चौकशी व अहवालासाठी) अन्वये गुन्हा दाखल केला आणि आत्महत्येबाबतचा तपास सुरू केला.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी 13 सप्टेंबरला NEET (UG) आयोजित करणार आहे. ‘विद्यार्थ्यांच्या करिअरला जास्त काळ धोक्यात आणता येणार नाही’, याकडे लक्ष देऊन सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी NEET आणि JEE पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.

मनात आत्महत्येचे विचार येणाऱ्या लोकांसाठी मदत म्हणून तामिळनाडू आरोग्य विभागाच्या हेल्पलाईन 104 किंवा स्नेहाच्या आत्महत्या रोखण्यासाठी हेल्पलाईन 044-24640050 किंवा आत्महत्या रोखण्यासाठी एन दामोदर शताब्दी ‘प्राण’ या नावाने लाइफलाईन क्रमांक 1800-121-203040 उपलब्ध आहे.