जि.प.शाळा लवकरच आदर्श शाळा म्हणून विकसित

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्हा परिषदांच्या ३०० शाळा आदर्श शाळा (मॉडेल स्कूल ) म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. उत्तम भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन या तीन निकषावर या शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्हा परिषदांच्या शाळा आदर्श म्हणून विकसित करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे ३०० शाळांची निवड करण्यात आली आहे.त्यात पहिली ते सातवीचे वर्ग आहेत, गरज वाटल्यास त्याला आठवीचा वर्गही जोडण्यात येईल, असे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.

शैक्षणिक गुणवत्ता यामध्ये उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, विद्यार्थ्यांना व्यवस्थित लिहिता, वाचता आले पाहिजे. प्राथमिक स्तरावर भाषा व गणित या विषयातील मूलभूत संकल्पना शिकवणे, त्यात वाचन, लेखन व गणिती क्रिया अवगत होणे अनिवार्य असेल.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –https://careernama.com