ZP Satara Recruitment 2023 : सातारा जिल्हा परिषद अंतर्गत मेगाभरती जाहीर; ‘या’ पदांच्या 972 जागा भरणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्हा निवड (ZP Satara Recruitment 2023) समितीच्यावतीने सातारा जिल्हा परिषदेतील 21 संवर्गातील ९७२ पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषद साताराच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध 972 रिक्त पदे जिल्हा परिषद साताराच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. गट-क मधील विविध संवर्गाच्या एकूण 972 रिक्त पदांकरिता अर्ज प्रक्रिया आजपासून (दि. 5 ऑगस्ट) सुरु झाली आहे. जाणून घ्या या भरतीविषयी सविस्तर…

संस्था – जिल्हा परिषद, सातारा
भरली जाणारी पदे – (ZP Satara Recruitment 2023)
आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
पद संख्या – 972 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 5 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2023
परीक्षा फी –
1. खुला वर्ग रु. 1000/-
2. राखीव वर्ग – रु. 900/-
(माजी सैनिकास अर्ज शुल्क नाही)
मिळणारे वेतन – दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत

काही महत्वाच्या तारखा –

वय मर्यादा –
(दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीचे उमेदवाराचे वय ग्राह्य धरणेत येईल.)
1. सर्वसाधारण प्रवर्ग – 18 ते 40 वर्षे
2. मागास प्रवर्ग – 18 ते 45 वर्षे

असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/ या संकेतस्थळावर जावे.
2. अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा ” (Click here for New Registration) टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एस. एम. एस. देखील पाठविला जाईल.
3. जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर तो ‘सेव्ह आणि नेक्स्ट’ (Save & Next ) टॅब निवडून आधीच “एंटर” (Enter) केलेला डेटा जतन करू शकतो. ऑनलाइन अर्ज “सबमिट” (Submit) करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाईन अर्जातील तपशीलांची पडताळणी (ZP Satara Recruitment 2023) करण्यासाठी ‘सेव्ह आणि नेक्स्ट’ (Save & Next) सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा. दृष्टिहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तपशीलांची पडताळणी करून घ्यावी.
4. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी, कारण “पूर्ण नोंदणी” (COMPLETE REGISTRATION BUTTON) बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल करणे शक्य होणार नाही.
5. उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र/गुणपत्रिका/ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल / तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
6. तुमचे तपशील सत्यापित करा (Validate your details) आणि जतन करा आणि पुढील (Save & Next) बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.
7. फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
8. नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन (ZP Satara Recruitment 2023) आणि पडताळणी करण्यासाठी “पूर्वावलोकन ” (Preview) टॅबवर क्लिक करा.
9. आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा (COMPLETE REGISTRATION).
10. पेमेंट (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व सबमिट (Submit) बटणा वरक्लिक करावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com