ZP Recruitment : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या 10 हजार 127 पदांच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार पेपर

करिअरनामा ऑनलाईन | 2019 मध्ये राज्यात होऊ घातलेली बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आणि बहुविवादित (ZP Recruitment) अशी पदभरती म्हणजे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाची पदभरती. याच पदभरतीच्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या संदर्भातील शासन निर्णय 26 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयाच्या माध्यमातून या पदभरतीची परीक्षा कशी होणार? याचं वेळापत्रक कसं असणार? या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

या आधी 2019 मध्ये जाहिरात काढून आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक अशा या संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या संदर्भातील जाहिरात काढण्यात आली होती. ऑनलाईन पद्धतीने अर्जही भरून घेतले गेले होते आणि या सर्व पदभरतीच्या संदर्भातील झालेल्या परीक्षा पेपर फुटीमुळे पुन्हा एकदा रद्द करण्यात आली होती.

आता हीच पदभरती परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यासाठी मार्च, 2019 महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट -क संवर्गाच्या पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे यापूढे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत तसेच, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी गोळा झालेली सर्व माहिती (DATA) व परिक्षा शुल्क अनुक्रमे मे. न्यारी कम्युनिकेशन प्रा.लि.व उप आयुक्त (आस्थापना), विभाग आयुक्त कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.

सदर पदभरती घेण्याच्या अनुषंगाने तसेच या बाबतच्या परिक्षा पारदर्शक व निःपक्षपाती पणे पार पाडण्याच्या दृष्टीने अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या अध्यक्षेते खाली अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता. याबाबत सर्व जिल्हा परिषदांशी सल्लामसलत करून आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील पदभरती बाबत परिक्षेचे वेळापत्रक ठरविण्यात येऊन शासनास सादर करण्याबाबत अध्यक्ष, राज्यस्तरीय समन्वय समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांना कळविण्यात आले होते.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती तपशील – (ZP Recruitment)

1) आरोग्य सेवक – (पुरूष) 3184 पदे

2) आरोग्य सेविक – 6476 पदे

3) आरोग्य पर्यवेक्षक – 47 पदे

4) औषध निर्माता – 324 पदे

5) प्रयोगशाळा तंत्रज्ञान – 96 पदे

शासन परिपत्रक –

मार्च 2019 व ऑगस्ट 2021 (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट – क मधील आरोग्य विभागाशी संबंधित 5 संवर्गातील पदभरती करण्याकरीता परिक्षा घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम (वेळापत्रक) पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com