पुणे : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण संचालनालयाकडून देण्यात येणारी एकलव्य शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. आर्टस्, कॉमर्स, सायन्स आणि लॉ विषयातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हि एक नामी संधी आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेतून 5 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि. ३० एप्रिल पर्यंत अर्ज करायचा आहे. जाणून घेऊया यासाठी काय आहे आवश्यक पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे.
आवश्यक पात्रता-
१. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
२. आर्ट्स, कॉमर्स आणि लॉ च्या विद्यार्थ्यांसाठी ६०% गुण तर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ७०% गुण आवश्यक
३. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 75 हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे.
४. अर्जदार अर्धवेळ किंवा पूर्णवेळ कुठेही काम करत नसावा
(टीप: महाराष्ट्राबाहेर शिकणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत.)
एकलव्य शिष्यवृत्तीचे फायदे-
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ५,००० रु. मिळणार
एकलव्य शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे-
१. तहसीलदाराचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
२. मागील वर्षाची मार्कशीट
३. अधिवास प्रमाणपत्र
असा करा अर्ज-
१. ‘अर्ज करा’ बटणावर क्लिक करा.
२. ‘नवीन अर्जदार नोंदणी’ वर क्लिक करा.
३. सर्व आवश्यक तपशील भरा, ईमेल आणि फोन नंबर भरा.
४. OTP किंवा बायोमेट्रिकद्वारे आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करा.
५. उमेदवारांनी OTP प्रमाणीकरणाची निवड केल्यास त्यांना त्यांच्या मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल.
६. सर्व आवश्यक तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
७. युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
८. शिष्यवृत्ती अर्ज पूर्ण करा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
Apply Now – Click here to visit the official website of Maharashtra government.
शासकीय परिपत्रक – Click Here
एकलव्य शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत:
30 एप्रिल 2022
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com