करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्करात महिलांना कमांड पोस्टींग देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मेजर जनरल माधुरी कानेटकर यांना 29 फेब्रुवारीला लेफ्टनन्ट जनरलच्या रँकसाठी प्रमोशन देण्यात आलं. माधुरी कानेटकर लेफ्टनन्ट जनरल बनणार्या इंडियन आर्म्ड फोर्सच्या तिसर्या महिला अधिकारी आहेत. तसेच त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला लेफ्टनन्ट जनरल ठरल्या आहे. त्यांना आता लष्कराच्या मुख्यालयात, इन्टीग्रेटेड डिफेन्स स्टाफमध्ये तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतकाचा वर्षाव होत आहे.
मेजर जनरल माधुरी कानेटकर चीफ ऑफ डिफन्स स्टाफच्या अंतर्गत तैनात होतील, ज्यांची मुख्य जबाबदारी संयुक्त योजना आणि एकीकरणच्या माध्यमातून सेवांची खरेदी, प्रशिक्षण आणि संचालनात अधिक ताळमेळासाठी अर्थसंकल्पातील तरतुदीचा योग्य उपयोग करणे ही आहे.
माधुरी कानेटकर या आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज पुणेच्या माजी डीन आहेत. त्यांचे पती लेफ्टनन्ट जनरल राजीव, ज्यांनी सशस्त्रमध्ये ही रँक मिळवली आहे. सर्जन आणि व्हाईस अॅडमिरल आणि भारतीय नौदलाच्या माजी थ्री स्टार फ्लॅग ऑफिसर डॉ. पुनिता अरोड़ा पहिल्या अधिकारी होत्या, ज्यांची लेफ्टनन्ट जनरल पदावर नियुक्ती करण्यात आली होती. हवाई दलाच्या महिला एयर मार्शल पद्मावती बंदोपाध्याय या पदावर बढती मिळणार्या दुसर्या महिला होत्या.
नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.