नितिन ब-हाटे
स्पर्धापरिक्षांची तयारी करुन अधिकारी व्हायची स्वप्न पाहणार्या तरुणांची संख्या या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाजगीत नोकरी करण्यापेक्षा सरकारी नोकरीत जाऊन समाजासाठी काहीतरी करु इच्छिणार्यांचा स्पर्धापरिक्षांकडे कल आहे. मात्र बर्याचवेळा स्पर्धापरिक्षांची तयारी कशी करावी, सिलेबस काय ते पुस्तके कोणती वाचायला हवीय अशा अनेक गोष्टींमधे विद्यार्थ्यांमधे द्विधा मनस्थिती होते. स्पर्धापरिक्षेची नव्याने तयारी करु इच्छिणार्या धेयवेड्या तरुणांसाठी स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख करुण देणारा हा लेख.
इतर महत्वाचे –
UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा | #भाग २
स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट | #भाग 3
स्पर्धा परीक्षा ही प्रामुख्याने दोन सेवांसाठी घेतल्या जातात. एक नागरी सेवेसाठी आणि दुसर्या म्हणजे व्यावसायिक सेवांसाठी. आपण नागरी सेवा साठीच्या स्पर्धापरिक्षाची तोंडओळख बघुया. देशाचा प्रशासकीय कारभार सांभाळण्यासाठी UPSC, MPSC, SSC इत्यादी आयोगामार्फत विविध पदांसाठी विशिष्ट परिक्षेमार्फत शासकीय कर्मचारी ते अधिकारी निवडले जातात. या पदांसाठी लाखोच्या पदवीधर गर्दीमधुन पदभार सांभाळण्यासाठीची कौशल्ये व गुण परिक्षार्थी मध्ये असावेत आणि योग्य अधिकारी निवडले जावेत म्हणुन स्पर्धापरिक्षांंचा अट्टाहास असतो. विविध अभ्यासक्रमाचे कोर्सेस पुर्ण केल्यानंतर नोकरी शोधण्यापेक्षा स्पर्धापरिक्षाची तयारी करुन शासकीय सेवेत जाणार्यांचा कल सध्या वाढला आहे
पात्रता –
कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी घेतल्यानंतर UPSC, MPSC इत्यादी स्पर्धा परिक्षा देता येतात. त्यासाठी विशिष्ट मार्क मिळविण्याची अट नसते. फक्त उत्तीर्ण असावे लागते, पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना सुध्दा परिक्षा देता येतात.
वयोमर्यादा –
प्रत्येक परिक्षा देण्यासाठी कमीतकमी आणि जास्तीत जास्त अशी वयाची अट असते . UPSC मध्ये वया बरोबर परिक्षा प्रयत्नांचेही बंधन असते (२१ ते ३२ वयामध्ये खुला प्रवर्ग असलेल्या परिक्षार्थीस ६ वेळा प्रयत्न करता येतात )
भाषा –
स्पर्धा परिक्षा मध्ये इंग्रजी किंवा हिंदी आणि एक प्रादेशिक भाषा (मराठी) इत्यादीचे भाषाज्ञान तपासले जाते. सरासरी पातळीचे इंग्रजी येणे अपरिहार्य आहे.
प्रवृत्ती आणि कल तपासणारी परिक्षा –
स्पर्धापरिक्षा या परिक्षार्थींचा प्रवृत्ती (attitude) आणि कल(aptitude) तपासणार्या असतात त्यामुळे या परिक्षांना गणित, बुद्धिमत्ता चाचणी , उतार्यांचे आकलन, चालु घडामोडी आणि सामान्य अध्ययन हे विषय अनिवार्य असतात.
इतर महत्वाचे –
परिक्षेचे स्वरुप –
प्रत्येक स्पर्धा परिक्षेसाठी ठराविक अभ्यासक्रम आणि परिक्षापद्धती असते . बहुतेक परिक्षांना पुर्व , मुख्य आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात , गट ब आणि क पदांसाठी आता मुलाखतीचा टप्पा काढुन टाकण्यात आला आहे .
१. पुर्व परिक्षा ही चाळणी परीक्षा असते तीचा उद्देश प्रामाणिक आणि योग्य दिशेने अभ्यास करणार्यांना मुख्य परिक्षेसाठी पास करणे किंवा नावाला परिक्षा देणार्यांना परिक्षा प्रक्रियेतुन गाळुन टाकणे हा असतो.
२. मुख्य परिक्षा ही पुर्व परिक्षा पास झालेल्यांसाठी असते . मुख्य परिक्षेत परिक्षार्थींचा कस लागतो कारण मुख्य परिक्षेचा अभ्यासक्रम मोठा असतो , प्रश्नपत्रिका विस्तृत असतात , तसेच अंतिम गुणवत्ता यादीत हे मार्क धरले जातात त्यामुळे पद मिळविण्यासाठी “मुख्य” परिक्षा नावाप्रमाणेच “मुख्य” असते.
३. मुख्य परिक्षा पास झालेल्या परिक्षार्थीची व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली जाते , त्याला सभोवतालच्या घडामोडींची असलेली जाण , समस्या सोडविण्याचे कौशल्य, निर्णय क्षमता इत्यादी बाबी मुलाखतीमध्ये तपासल्या जातात.
४.परिक्षार्थींना विशिष्ट परिक्षेस फोकस करुन अभ्यासक्रम, मागील वर्षी विचारलेले प्रश्न, चालु घडामोडी याआधारे पद मिळविण्यासाठी योग्य रणनीती आखणे आवश्यक आहे.
५.शासकीय यंत्रणेत जावुन समाजसेवा करण्यासाठी , प्रशासन गतिमान करण्यासाठी किंवा स्वत:च्या क्षमतांना सर्वोच्च न्याय देण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा एक राजमार्ग आहे , स्वत:ला ओळखुन ज्याला जसा जमेल तसा तो निवडावा त्यासाठी प्रामाणिक मार्गदर्शक सोबत असावा.
नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक ‘लोकनिती IAS, मुंबई’ चे संचालक/ मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत.)