WFH Jobs : Work From Home करायचंय?? Flipkart देणार मोठी संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। ज्यांना Work From Home करायचं आहे अशा जॉब सिकर्ससाठी फ्लिपकार्टने मोठी (WFH Jobs) योजना आखली आहे. देशातील टॉप ई- कॉमर्स कंपनी Flipkart लवकरच फ्रेशर्स आणि प्रोफेशनल उमेदवारांसाठी मोठी भरती करणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.

Work from Home

या ई-रिटेलर कंपनीने रिक्त पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या माध्यमातून उमेदवारांना घरून काम करण्याची परवानगी दिली जाईल. यासाठी Flipkart ने अनुभवी उमेदवारांकडून तसेच फ्रेशर्सकडून अर्ज मागवले आहेत.

इथे मिळेल माहिती – (WFH Jobs)

नोकऱ्यांबद्दल अधिक माहिती कंपनीच्या लिंक्डीन पेजवरून किंवा फ्लिपकार्ट करिअर साइटवरून उमेदवारांना मिळू शकणार आहे. फ्लिपकार्टनं नवीन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा असेल असं जाहीर केलं आहे.

अशी होईल निवड –

Flipkart दिल्ली, कर्नाटक, बिहार आणि इतर प्रदेशांमध्ये WFH मॉडेलसह विविध भूमिकांसाठी भरती करत आहे. ई-रिटेलर कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, लवकरच भरती प्रक्रिया (WFH Jobs) सुरू होईल. भरती प्रक्रिया व्हर्च्युअल पद्धतीने केली जाईल म्हणजेच मुलाखती ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येतील.

कंपनीच्या धोरणानुसार, निवड झालेल्या उमेदवारांना अधिक चांगली संधी दिली जाईल जेणेकरून ते कामात नावीन्य आणू शकतील. कंपनीने केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की कंपनीच्या कर्मचार्‍यांना अशा प्रकारे काम करावे लागेल जेणेकरून कंपनी स्पर्धात्मक आणि बाजारातील परिस्थितीशी सुसंगत राहू शकेल. फ्लिपकार्टच्या माध्यमातून फ्रेशर्स आणि प्रोफेशनल उमेदवारांना करिअरची मोठी संधी निर्माण झाली आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 

Flipkart linkedin

Flipkart Career

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com