करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारच्या वनविभाग परीक्षेत मोठा (Van Vibhag Exam) गोंधळ उडाला आहे. परीक्षेला फक्त 1 मिनिट उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा वर्गातून बाहेर ठेवण्याचा प्रकार घडल्याचे वृत्त समोर आले आहे. पुणे रामटेकडी येथील सुयोग हब परीक्षा केंद्रावर 25 ते 30 विद्यार्थ्यांना उशीरा आल्याने बाहेर ठेवले असून या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी; अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.
आज (दि. 2 ऑगस्ट) रामटेकडी पुणे या ठिकाणी वन विभागाच्या पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा सुरु होती. 1 मिनिट उशीर झाला म्हणून पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांना बाहेर काढले गेले. या विद्यार्थ्यांनी रडतच पुण्यातील मराठा क्रांती संघटनेशी संपर्क साधला. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांकडून (Van Vibhag Exam) शासनाने एक हजार रुपये परीक्षा शुल्क आकारले आहे. 1 हजार परीक्षा शुल्क भरणारे 35 लाख विद्यार्थी आहेत. फक्त महाराष्ट्रामध्ये 7000 हजार जागा आहेत. एकीकडे नोकरीसाठी स्पर्धा सुरु असताना 25 ते 30 विद्यार्थी बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.
वन विभागाच्या (Van Vibhag) परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी दोन वर्ष अभ्यास केला आहे. या विद्यार्थ्यांसंदर्भात शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होण्यापासून थांबवावे अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल; असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) धनाजी साखळकर यांनी दिला आहे.
राज्यभरातील अनेक परीक्षा केंद्रांवर असा प्रकार घडला आहे. परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारला याबाबत निवेदन दिले जाणार आहे, असे साखळकर यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com