जिद्ध हेच यशाचे गमक, अखेर वैभव नवले झाला “PSI”

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेली PSI परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत राज्यात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात वैभव नवले हा राज्यात पहिला आला आहे. सातारा जिल्ह्यातील दीपाली कोळेकर ही महिला गटात राज्यातून प्रथम आली.

वैभव नवले याच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण करमाळ्यात पूर्ण झाले आहे. त्यानंतर पदवीचे शिक्षण यशवंतराव महाविद्यालयात पूर्ण केले. वैभवने २०१६ ला ही  PSI ची परीक्षा दिली होती.परंतु १ मार्कांसाठी त्याला PSI पदासाठी मुकावं लागल. मात्र वैभवने माघार घेतली नाही. स्वतःचे कष्ट आणि जिद्दीचे फळ हेच यशाचे गमक आहे. असे मानून वैभवने मैदान सर केले.

सन २०१८ साली घेण्यात आलेली PSI च्या परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. या यशाने आई – वडील यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. नकळत त्यांच्या तोंडून निघाले असेल “आपल्या पोराने लढाई जिंकली” वैभव PSI झाला समजताच गावातुन कौतुकाचा वर्षाव झाला.

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob” visit : www.careernama.com