करियरनामा ऑनलाईन | भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. बारावी उत्तीर्ण तरुणांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट अधिकारी UPSC NDA Recruitment 2025 बनण्याची सुवर्णसंधी आहे. एनडीएच्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स विंग्ज मधील लेफ्टनंट पदाच्या 406 जागा भरल्या जाणार आहेत. भारतीय लष्करातर्फे या पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. चार वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, कॅडेट्सना लष्करात लेफ्टनंट पदावर कायमस्वरूपी भरती केले जाईल. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
पदाचे नाव –
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2025
भरतीचा तपशील आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
नॅशनल डिफेन्स अकॅडमी UPSC NDA Recruitment 2025
- लष्कर (Army)- 208 पदे
- शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण
- नौदल (Navy) – 42 पदे
- शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (PCM)
- हवाई दल (Air Force) – 120 पदे
- शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (PCM)
- नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] – 36 पदे
- शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (PCM)
वय मर्यादा –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2006 ते 01 जुलै 2009 या दरम्यानचा असावा.
अर्ज शुल्क –
- जनरल/ओबीसी – रु. 100/-
- SC/ST/महिला – फी नाही
नोकरी करण्याचे ठिकाण –
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतातील कोणतेही असेल.
अर्ज करण्याची पद्धत –
या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – UPSC NDA Recruitment 2025
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यसाठी येथे CLICK करा – https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php
अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/