NDA NA Exam Update: या तारखेला होणार जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी आणि नौदल अकॅडमी परीक्षेची विस्तृत माहिती ३० डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) १८ एप्रिल रोजी परीक्षेचे आयोजन करणार आहे. १९ जानेवारी २०२१ पर्यंत उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. २०२१ ची ही पहिली NDA NA परीक्षा असणार आहे.

UPSC NDA NA Exam Update 2020

राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीतील प्रवेशासाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा एप्रिल आणि सप्टेंबर मध्ये आयोजित केली जाते. मात्र, यावर्षी ही परीक्षा दोन वेळा आयोजित करता आली नाही. कोविड -१९ महामारीमुळे देशभरात असलेल्या लॉकडाऊन स्थितीमुळे एप्रिल महिन्यात होणारी परीक्षा लांबणीवर पडली. दोन्ही परीक्षा सप्टेंबरमध्ये एकत्र आयोजित करण्यात आल्या.

UPSC NDA NA Exam Update 2020

एनडीए आणि एनए प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे होतात. यूपीएससी या परीक्षेचे आयोजन करते. भरती बोर्ड इंटेलिजन्स आणि पर्सनालिटी टेस्टचं आयोजन करतं. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र होतात.यावर्षी NDA आणि NA परीक्षेसंबंधीची विस्तृत माहिती ९ जून २०२१ रोजी जारी होईल. परीक्षा ५ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित केली जाईल.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

खुशखबर! एक-दोन नव्हे तब्बल चार वेळा होणार JEE Main परीक्षा