UPSC Knowledge : UPSC परीक्षा देशात कधी सुरु झाली? कोण होते देशातील पहिले IAS अधिकारी? जाणून घ्या….

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या निकालाची (UPSC Knowledge) दरवर्षी देशभर चर्चा होते. जेव्हा जेव्हा निकाल जाहीर केला जातो तेव्हा सहसा प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे असते की कोणत्या राज्यातून आणि कोणत्या पार्श्वभूमीतून उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या परीक्षेत सर्वात आधी  कोणाला यश मिळाले? देशातील पहिले IAS अधिकारी कोण होते? यासोबतच पहिली UPSC परीक्षा कधी सुरू झाली? चला तर मग.. आज आपण याबाबतीत सविस्तर जाणून घेऊया…
इंग्रजांनी सुरू केली UPSC
सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा सर्वप्रथम इंग्रजीतून सुरू झाली. 1855 मध्ये इंग्रजांनी ही परीक्षा सुरु केली, तोपर्यंत ही सेवा बहुतेक ब्रिटिश सरकारच्या मालकीची होती.

UPSC Knowledge

भारतात 1922 मध्ये पहिल्यांदा घेतली परीक्षा (UPSC Knowledge)
देशातील सर्वोच्च प्रशासकीय पदांवर सेवा करण्याची संधी देणारी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ची नागरी सेवा परीक्षा (CSE) 1922 मध्ये देशात सुरू झाली. पूर्वी ही परीक्षा ‘इंडियन इम्पीरियल सर्व्हिस’ म्हणून ओळखली जात होती. मात्र, नंतर ही परीक्षा ‘संघ लोकसेवा आयोग’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
सत्येंद्रनाथ टागोर पहिले भारतीय IAS
देशातील पहिल्या IAS अधिकाऱ्याचे नाव सत्येंद्रनाथ टागोर होते. सत्येंद्र नाथ हे कोलकात्याचे होते. ते प्रेसिडेन्सी कॉलेजचे विद्यार्थी होते. सत्येंद्रनाथ यांच्या पत्नी जनांदनी (UPSC Knowledge) टागोर, मुलगा सुरेंद्र नाथ टागोर आणि मुलगी इंदिरा देवी असा त्यांचा परिवार होता.

 

UPSC Knowledge

टागोर हे कोलकात्याचे होते
भारतात पहिल्यांदाच UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS झालेले सत्येंद्र नाथ टागोर हे कवीही होते. बंगाली आणि इंग्रजी भाषेतही त्यांनी अनेक पुस्तके (UPSC Knowledge) लिहिली. सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म 1 जून 1842 रोजी कोलकाता येथे झाला. सत्येंद्रनाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोरांचे मोठे बंधू होते. सत्येंद्रनाथ टागोर यांच्यानंतर आणखी चार भारतीयांनीही या परीक्षेत यश मिळवले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com