नवी दिल्ली | विद्यापीठांना सोयीनुसार जुलैमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा घेता येतील. त्यासाठी कोविड १९ च्या आगामी काळातल्या परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेचा कालावधी २ तासापर्यंत कमी करता येईल, अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीनं केली आहे.
पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन एकतर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे केले जाऊ शकते किंवा मागील सत्रातील त्यांच्या कामगिरीच्या आधारे त्यांना सरासरी गुण दिले जाऊ शकतात. ज्या राज्यात परिस्थिती सामान्य झाली आहे अशा ठिकाणी सुद्धा या वर्गांच्या जुलैमध्येच परीक्षा घेण्यात याव्यात.
महाविद्यालयांमध्ये सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग ऑगस्टपासून तर नवीन विद्यार्थ्यांचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतील. दरम्यान, कोरोनाचा संकट आणखी बळावले आहे त्यामुळे आता दिलेल्या या माहितीची आणि सूचनांची खरोखर अंमलबजावणी होतेय का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.