Ukraine Returned Medical Students : युक्रेनहून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा; प्रवेश न घेताच देता येणार MBBS ची परीक्षा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतात परतलेल्या युक्रेनच्या वैद्यकीय (Ukraine Returned Medical Students) विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची तरतूद केली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, आता युक्रेनहून परतलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न घेता एमबीबीएस भाग 1 आणि 2 उत्तीर्ण करण्याची शेवटची संधी दिली जाईल; यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे तिथे शिक्षण घेणारे अनेक भारतीय विद्यार्थी पुन्हा मायदेशी परतले होते. यामध्ये मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या (Ukraine Returned Medical Students) विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. शिक्षण अर्धवट सोडावं लागल्यानं या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं होतं. आता या विद्यार्थ्यांना मेडिकलची फायनल परीक्षा उत्तीर्ण होण्याची शेवटची संधी मिळाली आहे.

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातल्या कॉलेजांमध्ये प्रवेश दिला जाईल; मात्र त्यांना एक वर्षाच्या आत प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. ही परीक्षा भारतातल्या मेडिकल (Ukraine Returned Medical Students) कोर्सच्या अभ्यासक्रमावर आधारित असेत.
काही ठरलेल्या सरकारी महाविद्यालयात प्रॅक्टिकल परीक्षा ही भारतीय एमबीबीएस अभ्यासक्रमाप्रमाणे असेल. परीक्षेनंतर रोटरी इंटर्नशीप दोन वर्षांसाठी अनिवार्य आहे. असा पर्याय देण्याची ही एकमेव वेळ आहे, असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं की, ‘ज्या विद्यार्थ्यांना रशिया-युक्रेन युद्धामुळे त्यांचं शिक्षण अर्धवट सोडून भारतात यावं लागलं, त्यांना सध्या कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये नोंदणी न करता एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला प्रवेश मिळेल; मात्र त्यांना कॉलेजमधल्या थिअरी आणि प्रॅक्टिकल (Ukraine Returned Medical Students) अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एकच संधी दिली जाईल. तसंच युक्रेनमधून परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांची अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण करावी लागेल. या विद्यार्थ्यांकडून पहिल्या वर्षासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही; मात्र दुसऱ्या वर्षाचं शुल्क भरावं लागेल असा निर्णय एनएमसीद्वारे यापूर्वीच घेण्यात आला आहे.’
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com