करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात अनेक (UGC Rule) बदल झाले आहेत. आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांच्या क्रेडिट स्कोअरसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यूजीसीच्या नवीन नियमामुळे देशाच्या साक्षरता अभियानाला चालना मिळणार आहे.
अजूनही भारतातील मोठी लोकसंख्या निरक्षर आहे. साक्षर आणि निरक्षर यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी यूजीसीने मोठा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत विद्यापीठाच्या (UGC Rule) विद्यार्थ्यांवर एक मोठी जबाबदारी दिली जात आहे. या उपक्रमामुळे देशातील निरक्षर लोकांची संख्या कमी होईल आणि सन 2047 पर्यंत भारतही विकसित देशांच्या यादीत सामील होऊ शकेल, असा विश्वास यूजीसीला आहे.
दरवर्षी 5 निरक्षरांना साक्षर करावे लागणार (UGC Rule)
विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी किमान 5 निरक्षर लोकांना शिकवावे लागणार आहे. त्याचा तपशील ugc.ac.in वर तपासता येईल. हा नियम विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना लागू होईल. या विद्यार्थ्यांना दरवर्षी 5 निरक्षर लोकांची निवड करून त्यांना लिहायला वाचायला शिकवावे लागणार आहे. त्या बदल्यात त्यांना क्रेडिट स्कोअर मिळेल, जो अभ्यासक्रमाच्या शेवटी निकालात जोडला जाईल.
नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार नियम
नव्या शैक्षणिक सत्रापासून हा नियम लागू होणार आहे. यासाठी यूजीसीने तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नियमाची अंमलबजावणी होण्यासाठी याला (UGC Rule) प्रत्येक प्रोजेक्ट आणि असाइनमेंटशी जोडण्यात येणार आहे. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात येणार आहे. सध्या देशातील साक्षरता दर 78 टक्के आहे.
निरक्षरांना मिळणार प्रमाणपत्र
या योजनेंतर्गत निरक्षर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पाच क्रेडिट स्कोअर दिले जातील. जेव्हा शिकणारा खऱ्या अर्थाने साक्षर होईल, तेव्हाच हे गुण मिळतील. त्यांचा (UGC Rule) अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्यांना साक्षर असल्याचे प्रमाणपत्र जाईल. त्यानंतरच विद्यार्थ्याला क्रेडिट स्कोअर मिळेल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com