करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठे आणि महाविद्यालयातील (UGC Professors Recruitment) प्राध्यापकांच्या रिक्त पदांबद्दल खुद्द विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच UGC ने नाराजी व्यक्त केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरा; असे निर्देश UGCने दिले आहेत. यासंबंधीचे पत्रही राज्यांना पाठविण्यात आले आहे.
12 वर्षांपासून रखडली भरती प्रक्रिया (UGC Professors Recruitment)
राज्यातील 60 टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त असून, तब्बल 12 वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली आहे. वेळोवेळी समाज घटकातील सर्वांनीच प्राध्यापक भरतीकडे लक्ष वेधले होते. मात्र राज्यस्तरावर कोणतीच हालचाल न झाल्याने, थेट UGCनेच पुढाकार घेत प्राध्यापक भरतीसाठी राज्यांवर दबाव आणला आहे. UGCचे अध्यक्ष प्रा. एम जगदीश कुमार यांनी यासंदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, शिक्षण सचिव आणि राज्यपालांचे सचिव यांना पत्र लिहलं आहे.
प्रा. जगदीश कुमार म्हणाले, “उच्च शैक्षणिक संस्थेमधील प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा परिणाम थेट अध्यापनावर होतो. त्यामुळे तातडीने पात्र आणि सक्षम उमेदवारांची पदे (UGC Professors Recruitment) भरली जाणे आवश्यक आहे. राज्याच्या आखत्यारीत येणारे विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांची पदे तातडीने भरावी यासाठी मी राज्य सरकारकडे आग्रह धरला आहे.”
अशी आहे प्राध्यापक भरतीची सद्यस्थिती (UGC Professors Recruitment)
1. राज्यातील सुमारे ६० टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त
2. मागील बारा वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली
3. अत्यंत अल्प प्रमाणात निवडक ठिकाणी भरती
4. महाविद्यालयांवर CHB प्राध्यापकांचा भार
5. उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कमालीची अनास्था
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com