UGC Portal : एका क्लिकवर विद्यार्थ्यांच्या तक्रारींचं होणार ‘ई-समाधान’; UGC लवकरच लाँच करणार पोर्टल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना येणाऱ्या कोणत्याही समस्यांचं आणि तक्रारींचं निवारण (UGC Portal) करण्यासाठी एक मोठा निर्णय आता UGC घेण्याच्या तयारीत आहे. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना येणाऱ्या कोणत्याही समस्यांचं आणि तक्रारींचं निवारण करण्यासाठी लवकरच आता पोर्टल लाँच केलं जाणार आहे.

‘ई-समाधान’ केंद्रीकृत पोर्टल

UGC आता ‘ई-समाधान’ नावाच्या केंद्रीकृत पोर्टलद्वारे विद्यापीठांमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व तक्रारींचं निरीक्षण करेल आणि त्यांचं निराकरण करेल अशी माहिती एका यूजीसीच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. तसंच हे पोर्टल पुढील एक आठवड्यात लाँच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

“संस्थात्मक घटकांच्या तक्रारींचं निराकरण हे आयोगाचं नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिलं आहे आणि त्या दिशेनं एक पाऊल म्हणून, UGC नं ई समाधान-ऑनलाइन तक्रार नोंदणी आणि देखरेख प्रणाली आणली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी बघून त्यांचं निराकरण केलं जाणार आहे.
UGC नं अँटी-रॅगिंग हेल्पलाइन वगळता सध्याची पोर्टल आणि हेल्पलाइन विलीन केली आहे आणि नवीन पोर्टल विकसित केले आहे, असं अधिकृत निवेदनात म्हंटल आहे. तसंच UGC ई-समाधान, भागधारकांच्या सेवेसाठी (UGC Portal) एक पाऊल पुढे टाकले आहे जे सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या तक्रारी/तक्रारी पोर्टलवर नोंदवण्यासाठी वन विंडो प्रणाली असेल जी माऊसच्या क्लिकवर सर्व वेळ उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या कोणत्याही समस्येवर तक्रारी नोंदवण्यासाठी UGC वेबसाइट 24×7 वर टोल फ्री क्रमांक 1800-111-656 देखील उपलब्ध असेल.

अशी नोंदवा तक्रार (UGC Portal)

  • अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यूजर मेल आयडीच्या मदतीने किंवा टोल-फ्री नंबरवर फोन कॉल करून एक सोपी प्रक्रिया अवलंबून तक्रार नोंदवता येईल.
  • तक्रार नोंदवली गेल्यानंतर एक डॉकेट क्रमांक दिला जाईल जो संबंधित ब्युरो हेडच्या खात्यांमध्ये आपोआप दिसून येईल.
  • संबंधित ब्युरो निर्धारित वेळेत समस्यांचे निराकरण करेल. अशी संपूर्ण प्रक्रिया असणार आहे.
  • प्रभावी अंमलबजावणीसाठी, संबंधित ब्युरो हेड रोजच्या रोज तक्रारींचा आढावा घेतील तर सचिव किंवा अध्यक्ष ते साप्ताहिक करतील.

पोर्टलचे फायदे –

  • विद्यार्थी एकाच व्यासपीठावर विविध तक्रारी दाखल करू शकतात.
  • योग्य कागदपत्रे आणि डॉकेट क्रमांकामुळे तक्रारींच्या प्रगतीचा (UGC Portal) मागोवा घेणे सोपे होईल.
  • आयोगाकडून कठोर पावले उचलण्यासाठी तक्रारींना प्रतिसाद न देणाऱ्या संस्थांची ओळख पटवण्यात मदत होईल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com