करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (UGC Net Exam Time Table) यूजीसी राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दि. 6 ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीत ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परीक्षेसाठी निश्चित केलेल्या शहरांची यादी परीक्षेच्या 10 दिवस आधी जाहीर केली जाणार आहे. एनटीए (NTA) च्या अधिकृत संकेतस्थळावर याविषयी माहिती उपलब्ध होणार आहे. यापूर्वी जून 2023 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.
NTA कडून परीक्षेसाठीचे केंद्र निश्चित केलेल्या शहरांची (UGC Net Exam Time Table) माहिती परीक्षेच्या दहा दिवस आधी प्रसिध्द केली जाणार आहे. www.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली जाणार आहे. उमेदवारांनी परीक्षेविषयी अद्ययावत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी; असे आवाहन NTAकडून करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार दि. 6 डिसेंबर 2023 रोजी दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे.
अशी होणार परीक्षा (UGC Net Exam Time Table)
पहिल्या सत्रात इंग्रजी, हिंदू स्टडीज, कोकणी व इतर काही परिकीय भाषांची परीक्षा असेल. तर दुसऱ्या सत्रात इतिहास, मणिपुरी, जर्मन, सिंधी या विषयांच्या परीक्षा असतील. वाणिज्य विषयाची परीक्षा सात डिसेंबरला पहिल्या सत्रात तर शारीरिक शिक्षण, भारतीय संस्कृती, संगीत, फ्रेंच, संगणकशास्त्र आदी विषयांच्या परीक्षा दुसऱ्या सत्रात नियोजित केल्या आहेत. अशाचप्रकारे दररोज दोन सत्रांमध्ये विविध विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com