करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत (UGC NET Exam Date 2024) घेतल्या जाणाऱ्या UGC NET परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता दि. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत 83 विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. एनटीएतर्फे (NTA) या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसह पीएचडी प्रवेशासाठी गुण ग्राह्य धरले जाणार (UGC NET Exam Date 2024)
एनटीएतर्फे यूजीसी नेट जून 2024 परीक्षा केव्हा घेतली जाणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसह यंदा प्रथमच पीएचडी प्रवेशासाठी सुद्धा या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यूजीसी नेट जून 2024 ही परीक्षा कोणत्या विषयांसाठी असेल याबाबतची सविस्तर (UGC NET Exam Date 2024) माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परीक्षेपूर्वी 10 दिवस आधी परीक्षा केंद्राचे नाव व शहराचे नाव विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी यूजीसीच्या (UGC) www.nta.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com