मुंबई । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ हजार पार गेली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य सेवासंबंधी कोर्स झालेल्यांची आज महाराष्ट्राला गरज असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही याआधी आरोग्य सेवेत होता मात्र आता निवृत्त झाला आहात, किंवा रिक्त पदे नसल्याने तुमच्याकडे नोकरी न्हवती तर आता अशांनी आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.
आरोग्य विभागात काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका व वॉर्डबॉय, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अनेकांची कोरोनाविरूद्ध युध्दात सहभागी होण्याची हिंमत व तयारी असेल तर सोबत या, आपली महाराष्ट्राला गरज आहे!
या ईमेलवर आपले नाव, नंबर किंवा संपर्कासाठी पत्ता द्या! pic.twitter.com/VGHh9L5NVt
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 10, 2020
जे भारतीय सैन्याच्या आरोग्य विभागात होते आणि आता निवृत्त झाले आहेत अशांना देखील ठाकरेंनी आवाहन केले आहे. आज राज्यावर मोठे संकट आले असून आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची राज्याला आवश्यकता आहे. तेव्हा ज्यांचे आरोग्य सेवेसंबंधी शिक्षण झाले आहे मात्र नोकरी नाही किंवा नोकरीतून निवृत्ती झाली आहे अशांची आज महाराष्ट्राला गरज आहे.
आरोग्य विभागात काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका व वॉर्डबॉय, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अनेकांची कोरोनाविरूद्ध युध्दात सहभागी होण्याची हिंमत व तयारी असेल तर सोबत या, आपली महाराष्ट्राला गरज आहे! असे म्हणत ठाकरे यांनी इच्छुकांना [email protected] या ईमेलवर आपले नाव, नंबर किंवा संपर्कासाठी पत्ता पाठवण्याचे आवाहन केले आहे.
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
भिलवाडा पॅटर्नच्या पाठीमागे 'या' तरुण महिला IAS अधिकाऱ्याचे डोके! जाणून घ्या काय आहे 'हा' पॅटर्न
@tinadabikhan या २०१५ च्या यु.पी.एस.सी. टाॅपर राहिल्या आहेत#BhilwaraModel #TinaDabi #Careernama #Career #Job #UPSC https://t.co/d9P8wbbHrx— Careernama (@careernama_com) April 10, 2020
शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत केंद्र सरकार म्हणते…
वाचा बातमी👉🏽 https://t.co/ZvPhnWdMmY— Careernama (@careernama_com) April 10, 2020
*
मुंबई पश्चिम रेल्वे आरोग्य विभागाच्या १२६ जागांसाठी भरती जाहीर
जाणुन घ्या अर्ज प्रक्रिया👉🏽 #Careernama #career #Job #coronavirus https://t.co/BYeD40j3vg— Careernama (@careernama_com) April 10, 2020