MAH CET Exam 2025: एकाच दिवशी दोन पेपर;CET परीक्षेच्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन। आपल्या भारतातील विविध महत्वाच्या परीक्षापैकी एक महत्वाची परीक्षा म्हणजे CET होय. अनेक विद्यापीठांची प्रवेश परीक्षा ही CET परीक्षेच्या माध्यमातून घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्वाची परीक्षा असते. (MAH CET Exam 2025) या परीक्षेची तयारी 10वी, 12 वी, पासूनच विद्यार्थी करत असतात. मात्र सीईटी परीक्षेच्या नवीन वेळापत्रकानुसार सीबीएसई बारावी बोर्डाचा आणि सीईटीचा पेपर एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विद्यार्थी आणि पालकांनी ही गोष्ट ध्यानात आणून दिल्यानंतर वेळापत्रकात बदल केला जाईल, अशी माहिती सीईटी कक्षा कडून देण्यात आली आहे. मात्र अद्याप सुधारित तारखा केव्हा जाहीर केल्या जातील? याबाबत स्पष्ट कल्पना अजूनही देण्यात आली नसल्याने विद्यार्थी प्रचंड गोंधळात आहेत.

(5 year llb cet exam date 2025) CET परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ हा विद्यार्थ्याना मिळायला हवा आणि परीक्षेच्या काळात कुठल्याही प्रकारचा ताण त्यांना जाणवू नये यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) ने तात्पुरत्या जाहीर केलेल्या वेळापत्रकातील एका परीक्षेच्या तारखेत बदल केला जाणार आहे. सीबीएसईचा (CBSE) मानसशास्त्र विषयाचा पेपर आणि एलएलबी (LLB) पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची (MAH CET Exam 2025) सीईटी परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांचा मनात गोंधळ निर्माण झालेला आहे. ही बाब लक्षात घेवूनच सीईटी कक्षाने वेळापत्राकात बदल करण्याचा निर्णय घेतलेला असावा. सुधारित तारखा लवकरच जाहीर होतील, अशी माहिती सीईटी कक्षाचे (Admission process for LLB 5 years in Maharashtra) आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली आहे.

महत्वाची बाब म्हणजे CBSE बोर्ड ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 1 ते 4 एप्रिल दरम्यान बारावी सीबईसी च्या विद्यार्थ्यांची इतिहास, भाषा, होम सायन्स आणि मानशास्त्र या विषयांची सलग परीक्षा होणार आहे. मानशास्त्र विषयाचा पेपर आणि सीईटी परीक्षा (MAH CET Exam 2025) एकाच दिवशी आली आहे आणि सीबीएस बोर्डाची परीक्षा देणारे लाखों विद्यार्थी आहेत आणि त्यातील बरेच विद्यार्थी हे सीईटी परीक्षा देखील देणार असल्यामुळे सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करावा अशी मागणी विद्यार्थी आणि पालक करत आहेत.

सीईटी कक्षाने या गोष्टींची दखल घेतली असून लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येईल अशी माहिती दिलेली आहे. ‘परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कोणताही अतिरिक्त ताण सहन करावा लागू नये, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. विद्यार्थ्यांचा विचार करूनच पुढील सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील,’ असे आयुक्त सरदेसाई म्हणाले आहेत.