करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली ओम बिर्ला यांच्याविषयी सामाजिक माध्यमांमध्ये एक पोस्ट वायरल होत आहे. ती म्हणजे अंजली ओम बिर्ला यांनी परीक्षा न देता युपीएससी मधून त्यांना पोस्ट मिळाली आहे. यावर सत्य आणि अंजली ओम बिर्ला यांची बाजू शोधण्याचा ‘करिअरनामा‘ ने प्रयत्न केला. जाणून घेऊया या व्हायरल गोष्टीमागील सत्य…
देशभरामध्ये सर्वात प्रतिष्ठित समजली जाणारी यूपीएससी परीक्षा ! या परीक्षेतून स्टील फ्रेम समजले जाणारे प्रशासकीय, पोलीस, महसूल, विदेश सेवा आणि इतर सेवा इत्यादी महत्त्वाचे पदे भरली जातात. देशभरातून लाखो मुलं यासाठी प्रयत्न करत असतात. यूपीएससीची पूर्व, मुख्य परीक्षा नंतर मुलाखत होऊन यादी लागल्यानंतर काही मुलांची रिजर्वे यादी नंतर लागली. त्या यादीमध्ये अंजली यांचे नाव होते. त्यामुळे अंजली या यूपीएससी परीक्षेतील सर्व टप्पे पार करून आल्याचे स्पष्ट झाले व त्यांची रिजर्व यादीतून नाव पुढे आल्याचेही समजले. त्यानंतर अंजली बिर्ला यांच्या इंस्टाग्राम अकाउट वर त्यांनी स्वतः पोस्ट केलेली पोस्टही पाहिली. त्यामध्ये त्या सांगतात की, ‘हे सर्व पाहून मला हसू आले होते पण यामध्ये काही तथ्य नसून ही बातमी खोटी आहे ‘.
View this post on Instagram
अंजली बिर्ला यांची निवड कुठल्या पदासाठी होईल अजून ठरले नसून, त्यांना काही दिवसानंतर सेवा देण्यात येईल. त्यामुळे त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड झाल्याची बातमीही खोटी असल्याची आढळून आले. तसेच अंजली या यूपीएससीच्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत या सर्व टप्प्यांमधून पास होऊन त्यांचे शेवटच्या यादीमध्ये नाव आले असल्याचेही तितकेच खरे आहे. त्यामुळे सोशल मीडिया मध्ये फिरणारी खोट्या बातमीमध्ये अजिबात तथ्य नसून ती सपशेल खोटी आहे असे ‘हॅलो महाराष्ट्र’ला समजले.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअर आणि नोकरी विषयक सर्व अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुपला Join व्हा. Click Here क्लिक करा
An online rumour in India that politician Om Birla's daughter passed the top civil service exam without even taking the test is false ❌
Official records show Anjali Birla took both the preliminary and main test in 2019 🖊️🎓 https://t.co/2klAxyJe4C
— AFP Fact Check 🔎 (@AFPFactCheck) January 19, 2021
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com