Trics of Interview : तुम्हाला माहित आहे का? मुलाखती दरम्यान ‘हे’ प्रश्न विचारले जातात

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीसाठी मुलाखत देताना आपण कसून पुर्वतयारी करतो. पण ऐनवेळी (Trics of Interview) मुलाखतकार आपल्या अपेक्षेपलीकडे प्रश्न विचारतात, ज्याची उत्तरे देताना आपला गोंधळ उडतो. त्यामुळे मुलाखतीदरम्यान सर्वसाधारणपणे कोणते प्रश्न विचारले जातात, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

मुलाखतीदरम्यान सहसा विचारले जाणारे हे खालील प्रश्न जाणून घ्या आणि तशी तयारी करा.

1. स्वतः चा परिचय द्या

कोणत्याही मुलाखतीच्या सुरुवातीला विचारला जाणारा हा सर्वसामान्य प्रश्न आहे. याद्वारे तुमच्याबद्दल HR अधिकाऱ्याला माहिती जाणून घ्यायची असते. अशावेळी तुम्ही कंपनीच्या कामाला अनुसरुन नेमक्या शब्दात माहिती देणे आवश्यक आहे. उमेदवाराने यामध्ये मुद्देसुद बोलणे महत्वाचे असते. स्वत:बद्दल जितकी सकारात्मक माहिती देता येईल, ती देण्याचा प्रयत्न करावा.

2. तुम्ही हे क्षेत्र का निवडले? (Trics of Interview)

HR अधिकाऱ्याच्या यादीत नक्कीच हा प्रश्न असतो की तुम्ही हे क्षेत्र का निवडले? यावरून तुम्हाला या क्षेत्रात खरोखरच रस आहे की नाही? हे त्यांना समजून घ्यायचे असते. या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्ही हे क्षेत्र निवडण्यामागचे आपले नेमके उद्दीष्ट्य, आपण या क्षेत्रात केलेले काम आणि भविष्यात करु इच्छणारे काम याचा थोडक्यात आढावा देऊ शकता.

3. तुमचा ड्रीम जॉब काय आहे?

जेव्हा HR मुलाखत घेतात तेव्हा ड्रीम जॉबबद्दलचा प्रश्न नक्कीच विचारतात. यावरून तुम्ही भविष्यात काम करण्यास किती इच्छुक आहेत हे, त्यांना कळू शकते. याचे उत्तर अतिशय (Trics of Interview) काळजीपूर्वक द्या. तुम्ही जे सांगाल त्याला अनुसरुन एचआर पुढील प्रश्न विचारणार आहे हे लक्षात असू द्या.

4. तुम्ही कामाशी संबंधित स्ट्रेस आणि प्रेशर ला कसे हाताळता ?

या प्रश्नाच्या उत्तरावरून तुम्ही कामाशी संबंधित स्ट्रेस आणि प्रेशर हाताळू शकता की नाही, हे HR समजून घेतात. त्यामुळे या संबंधित उत्तर देताना जाणीवपूर्वक विचार करून उत्तर देणे गरजेचे आहे.

5. आपल्याला किती पगार अपेक्षित आहे ?

हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून हा आपल्या नोकरीचा महत्त्वाचा घटक आहे. अपेक्षित पगार मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे आपला अपेक्षित पगार व्यवस्थित सांगावा. याचे (Trics of Interview) परफेक्ट उत्तर देण्यासाठी इंटरनेट वर Average Salary बाबत Research करावा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com