शिपायांपासून डॉक्टरांपर्यंतच्या जागा भरणार; पुढील चार दिवसांत प्रक्रिया सुरु करणार असल्याची आरोग्यमंत्री टोपेंची घोषणा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन : राज्यात सध्या एकीकडे कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. तर दुसरीकडे ‘म्युकरमायकोसिस’ या नव्या आजाराच्या रुग्णांतही भर पडत आहे. अशा परिस्थितीत या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागात कर्मचारी व डॉक्टरांची कमतरता भासत आहे. हि कमतरता भरून काढण्यासाठी जास्त संख्येने पदांची भरती करणे गरजेचे आहे. यादृष्टीने आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची घोषणा केली. राज्यातील आरोग्य विभागात असणारी शिपायांपासून ते डॉक्टरांपर्यंतची पदे भरण्याची प्रक्रिया येत्या चार ते पाच दिवसांत सुरु करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.

राज्यात लॉकडाऊन वाढविल्यामुळे अनेक कंपन्या, उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने सुशिक्षित, उच्चशिक्षित तरुण-तरुणी घरात बसून आहेत. विशेष करून मेडिकल, वैद्यकीय क्षेत्रातील तरुण-तरुणींना शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाहीय. त्यांच्यासाठी हि महत्वाची बातमी असून राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी राज्यातील ज्या ठिकाणी शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या आरोग्य विभागात शिपाई तसेच वैद्यकीय अधिकारी आदींसह महत्वाची असणारी पदे भरलेली गेलेली नाहीत. त्या ठिकाणी नव्याने पदांची भर्ती केली जाणार आहे,” अशी माहिती दिली आहे.

आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत शासनाच्यावतीने वैद्यकीय क्षेत्रात करण्यात येणाऱ्या विविध पदांच्या भर्तीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. आरोग्यमंत्री डॉ. टोपेंनी केलेल्या या पदांच्या भर्तीच्या घोषणेनंतर वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या लाखो विद्यार्थी तसेच तरुण-तरुणींना नोकरीची संधी लाभणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com